CRIME | बनावट नोटा देऊन कार खरेदी; चाकण पोलिसांकडून टोळीचा मोठा पर्दाफाश

 0
CRIME | बनावट नोटा देऊन कार खरेदी; चाकण पोलिसांकडून टोळीचा मोठा पर्दाफाश

चाकण : खेळण्यातील बनावट नोटांचा वापर करून चारचाकी गाडीची फसवणूक करणाऱ्या टोळीचा चाकण उत्तर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या प्रकरणात आरोपींकडून तब्बल ४२ लाख ५० हजारांच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी हुजेब फिरोज बागवान (वय २६, रा. बारामती) हे त्यांच्या मित्राची मारुती सुझुकी अल्टो (MH 42 AX 5880) गाडी विकण्यासाठी पुण्यात आले होते. यावेळी आरोपी गणेश ज्ञानदेव ठाकरे याने मोबाईलवरून संपर्क साधून गाडी खरेदी करण्याची इच्छा व्यक्त केली.

*  माणिक चौक, चाकण येथे ठरला व्यवहार -

आरोपीने गाडीची किंमत ₹३.५ लाख निश्चित केली. त्यापैकी ₹३ लाख रोख रक्कम प्लास्टिकमध्ये गुंडाळून ५०० रुपयांच्या नोटांच्या बंडलमध्ये दिली. उर्वरित ₹५० हजार नाव ट्रान्सफरनंतर देण्याचे सांगितले.

मात्र आरोपी गाडी घेऊन पसार झाल्यानंतर बंडल उघडून पाहिले असता, वरची-खालची नोट खरी आणि मधल्या सर्व नोटा खेळण्यातील बनावट असल्याचे उघड झाले.

* पोलिसांची झटपट कारवाई -

तक्रार मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र कदम व पोलीस निरीक्षक विनोद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक सचिन मोरखंडे, पोलीस हवालदार भैरोबा यादव, प्रीतम ढमढेरे, कोळेकर आणि पोलीस अंमलदार महेश कोळी, शिवाजी लोखंडे,जगताप यांच्या पथकाने तातडीने तपास सुरू केला. तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त माहितीच्या आधारे काही तासांतच आरोपींना अटक करण्यात आली.

* अटक आरोपी - 

गणेश ज्ञानदेव ठाकरे 

समीर दिनकर महल्ले

*  जप्तीमध्ये काय मिळाले? -

फसवणुकीत वापरलेली अल्टो कार

₹४२.५ लाखांच्या बनावट नोटा (₹५०० चे बंडल)

गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल

नोटा पॅक करण्याचे साहित्य

* पोलिसांचे आवाहन -

रोख व्यवहार करताना नोटांची नीट तपासणी करूनच व्यवहार करावा, असे आवाहन चाकण पोलिसांनी नागरिकांना केले आहे.

*  पुढील तपास सुरू आहे. -