छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल बेताल वक्तव्य करणाऱ्याचा जाहीर निषेध

 0
छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल बेताल वक्तव्य करणाऱ्याचा जाहीर निषेध

पुणे : महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विरोधात आक्षेपार्ह विधान करून समस्त शिवभक्तांच्या मनाला ठेस लावून देणाऱ्या राहुल सोलापूरकर याला मराठी चित्रपट सृष्टीतून बेदखल करण्याची मागणी छावा मराठा संघटनेच्या वतीने मेघराजे भोसले यांना देण्यात आलेल्या निवेदनात करण्यात आली आहे.

याप्रसंगी छावा मराठा सेनेच्या महिला आघाडीच्या महाराष्ट्र राज्य प्रदेश अध्यक्षा संगिता नाईकरे, महाराष्ट्र राज्य प्रदेश उपाध्यक्ष शिवकन्या मोरे,पुणे जिल्हा अध्यक्ष सुप्रिया मुळुक,महाराष्ट्र राज्य प्रदेश सचीव संगिता कड,पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष ज्योती पडवळ,पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष रंजना चन्ने,पश्चिम महाराष्ट्र सचीव ज्योती खंडागळे,अल्पसंख्याक महाराष्ट्र अध्यक्षमहरूम पठाण,अल्पसंख्याक महाराष्ट्र सचीव मीनाताई शहा,पिंपरी चिंचवड अध्यक्ष अश्विनी भोसले,चाकण शहर अध्यक्ष मंगलताई गोसावी,चाकण शहर सचिव चारूशिला पुरी आदीं पदाधिकारी उपस्थित होते.

महापुरुष हा कोणत्या जातीचा किंवा धर्माचा नसतो तर तो प्रत्येक महापुरुष हा राष्ट्रपुरुष असतो आणि राष्ट्रपुरुषाचा अपमान म्हणजेच राष्ट्राचा अपमान केल्याच्या बदल्यात राहुल सोलापूरकर यांच्यावर योग्य ती कारवाई करावी त्यांच्यावरती राष्ट्र द्राहाचा गुन्हा दाखल व्हावा अशीच छावा संघटनेची आहे.त्यांच्यावरती योग्य ती कारवाई न झाल्यास छावा मराठा संघटनेच्या वतीने योग्य ती कारवाई व आंदोलन करण्यात येईल असा इशारा छावा मराठा सेनेच्या राज्याच्या अध्यक्षा संगीता नाईकरे यांनी दिला आहे.