शासकीय अधिकारी यांचे तब्बल ३९ वेळा रक्तदान करून केला विक्रम
पुणे : खेड तालुक्यातील भोसे ग्रामपंचायतीचे ग्रामपंचायत अधिकारी बाळासाहेब बिंदले यांनी एक सामाजिक बांधिलकी म्हणून आतापर्यंत तब्बल ३९ वेळा रक्तदान करून विक्रम केला आहे. अनेक ठिकाणी रक्तदान शिबिरामध्ये त्यांनी सहभाग घेऊन रक्तदान केले आहे.त्यांनी शहीद दिनाच्या दिवशी राजगुरू यांच्या जन्मस्थानी पुन्हा रक्तदान करून ३९ वा विक्रम केला आहे.
आजकाल या धावपळीच्या युगात हॉस्पिटलमध्ये अनेक रुग्णांना शस्रक्रिया करतानी रक्ताची आवश्यकता असते.ऐनवेळी काही रुग्णांना रक्त उपलब्ध होत नाही.यासाठी अनेक सामाजिक संस्थाकडून रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येते.काल देशाला स्वातंत्र्य मिळालेल्या सुखदेव,भगतसिंग,राजगुरू यांच्या शहिद दिनाच्या दिवशी राजगुरू यांच्या वाड्यात आयोजित केलेल्या रक्तदान शिबीरात त्यांनी सहभाग घेऊन पुन्हा आपली सामाजिक बांधिलकी जोपासली.यावेळी त्यांचा सन्मान माजी जिल्हा परिषद सदस्य अतुलभाऊ देशमुख यांच्या हस्ते करण्यात आला.