राजकीय वर्तुळात खळबळ,आरपीआय नेते अनिल मोरे यांची हत्या,आरोपी फरार

 0
राजकीय वर्तुळात खळबळ,आरपीआय नेते अनिल मोरे यांची हत्या,आरोपी फरार

क्राईम | मोशी येथील देहू फाटा परिसरात आरपीआय कामगार आघाडीचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष अनिल मोरे यांची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. ही घटना (दि.१३ ) रोजी रात्री साडे नऊ वाजण्याच्या सुमारास घडली असून,यामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अनिल मोरे यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी जीवघेणा हल्ला केला होता. या घटनेनंतर त्यांना उपचारासाठी तातडीने पिंपरी येथील वायसीएम रुग्णालयात नेण्यात आला.परंतु पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला आहे.

या हत्येचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही.परंतु अनिल मोरे यांची मागील काही वर्षांत चाकण व महाळुंगे पोलीस ठाण्यात नेहमी येजा असे. एमआयडीसीमधील काही कंपन्यांमध्ये देखील त्यांचा वावर होता. चाकण मधील काही कार्यकर्ते व महिला कार्यकर्त्या ही त्यांच्या संपर्कात होत्या. त्यांच्या निर्घृण खुनाच्या मागे नेमकी काय पार्श्वभूमी आहे ? पोलीस सध्या आरोपींचा शोध घेत असून पुढील तपास सुरू आहे.