विहिरीत सापडला बेपत्ता तरुणाचा मृतदेह;उत्तर चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
क्राईम | दोंदे (ता.खेड) येथून बेपत्ता झालेल्या तरुणाचा मृतदेह संगमवाडी येथील एका विहिरीत आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.मंगेश ज्ञानेश्वर उडाणे (वय ३७, रा. दौडे ता. खेड जि. पुणे) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे.याप्रकरणी उत्तर चाकण पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
दीपक किसन दरवडे (वय.४५ वर्षे, रा.दोंदे,ता.खेड,जि.पुणे) यांनी उत्तर चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,मंगेश ज्ञानेश्वर उडाणे हा (दि. ८ मार्च २०२६) पासून घरातून बेपत्ता झाल्याची फिर्याद खेड पोलीस ठाण्यात फिर्यादीच्या पत्नीने दिली होती.
दरम्यान, ( ८ मार्च ) रोजी दुपारी सुमारे दोन वाजून पंधरा मिनिटांनी मंगेश उडाणे याने फिर्यादीच्या पत्नीला व्हिडिओ कॉल केला होता.त्या कॉलमधील परिसर संगमवाडी असल्याचा अंदाज आल्याने नातेवाईकांनी (दि.९ मार्च ) रोजी सकाळी साडे नऊ वाजण्याच्या सुमारास त्या परिसरात शोध घेतला असता,तेथील एका विहिरीत मंगेश उडाणे याची चप्पल पाण्यावर तरंगताना दिसल्याने संशय निर्माण झाला.तत्काळ ११२ वर फोन करून पोलिसांना कळविण्यात आले.उत्तर चाकण पोलीस स्टेशनचे पथक घटनास्थळी दाखल झाले.रेस्क्यू टीमच्या मदतीने विहिरीत शोध घेतला असता पाण्यातून काढण्यात आलेला मृतदेह मंगेश उडाणे याचाच असल्याचे आढळून आले.
या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून,पुढील तपास उत्तर चाकण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र कदम यांच्या मार्गदर्शनाखाली येथील पोलीस करत आहेत.