चाकणच्या वाहतूक कोंडीविरोधात १८ ऑगस्टपासून 'साखळी उपोषण'

स्थानिकांनी दिली आंदोलनाची हाक

 0
चाकणच्या वाहतूक कोंडीविरोधात १८ ऑगस्टपासून 'साखळी उपोषण'

चाकण : चाकण औद्योगिक क्षेत्रासह प्रमुख महामार्गांवरील दररोजच्या भीषण वाहतूक कोंडी,कचरा,पाणी,वीज,सांडपाणी, गुंडगिरी या समस्येवर ठोस उपाययोजनांची मागणी करत नागरिक,कामगार आणि उद्योजक आता आक्रमक झाले आहेत.समस्येकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी १८ ऑगस्ट २०२६ ते १९ ऑगस्ट २०२६ दरम्यान ‘साखळी उपोषण’ आयोजित करण्यात आले आहे.

​पुणे जिल्हा परिषदेचे सदस्य पै. गणेश कांताराम बोत्रे (सदस्य, बांधकाम समिती - जि. प. पुणे) यांच्या पुढाकाराने हे आंदोलन होणार आहे.

* ​आंदोलनामागील मुख्य कारणे व मागण्या - 

​१. सर्व घटकांना होणारा त्रास - 

चाकण औद्योगिक वसाहतीमधील दररोजच्या प्रचंड वाहतूक कोंडीमुळे स्थानिक नागरिक, कारखान्यांमध्ये काम करणारे कामगार, उद्योजक आणि वाहनचालक यांना नाहक मानसिक व शारीरिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे.

​२.ठोस उपाययोजनांची मागणी -

केवळ तात्पुरत्या मलमपट्टीऐवजी या भागातील ट्रॅफिकची समस्या मुळापासून सोडवण्यासाठी प्रशासनाने ठोस व कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, अशी प्रमुख मागणी या उपोषणाद्वारे केली जात आहे.

​३.सर्वसमावेशक लढा -

"प्रश्न उद्योग नगरीचा, प्रश्न सर्व घटकांचा" आणि "सगळ्यांच्या हक्कासाठी..." ही भूमिका घेत एमआयडीसी परिसर ट्रॅफिकमुक्त करण्यासाठी सर्व घटकांनी एकत्र येण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

* ​आयोजकांचे आवाहन -

"हा प्रश्न केवळ एका व्यक्तीचा नसून आपल्या सर्वांच्या दैनंदिन आयुष्याशी आणि हक्काशी जोडलेला आहे. त्यामुळे म्हाळुंगे-चाकण MIDC ट्रॅफिकमुक्त करण्यासाठी नागरिकांनी व सर्व घटकांनी मोठ्या संख्येने एच.पी. चौकात उपस्थित राहावे." — पै. गणेश कांताराम बोत्रे,जिल्हा परिषद सदस्य.