चाकणला भाजपचे पंडित दीनदयाल उपाध्याय निवासी शिबिर उत्साहात

 0
चाकणला भाजपचे पंडित दीनदयाल उपाध्याय निवासी शिबिर उत्साहात

राजकीय | चाकण भारतीय जनता पार्टीच्या वतीने पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या विचारांवर आधारित एक दिवसीय निवासी शिबिर २८ व २९ रोजी चाकण येथील सह्याद्री अकॅडमीमध्ये उत्साहात पार पडले. समाजातील अंतिम घटकाच्या उत्थानासाठी कार्यरत असणाऱ्या कार्यकर्त्यांना दिशा देण्याच्या उद्देशाने या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.या शिबिराचे आयोजन चाकण मंडल अध्यक्ष भगवान मेदनकर यांनी केले. 

यावेळी प्रिया पवार,शांताराम भोसले,संदीप सोमवंशी,शाम पुसदकर,संदेश जाधव,अजय जगनाडे,अनिल सोनवणे,धीरज वाळुंज,मंगेश देसाई,संतोष ओतारी,प्रितम शिंदे,मालिनी शिंदे, प्रवीण करणे,अरुणा पगारे,सरला बोरसे,किरण वरखडे,बाळासाहेब भोपे,भाऊसाहेब कुटे,दत्ता परदेशी,गणपती गौडा पाटील,नसीम पठाण,प्रशांत शेवकरी,शार्दूल पठाण,किशोर भुजबळ,योगेश देशमुख,श्रीकांत परदेशी,रावसाहेब ढेरंगे,सुधीर भांगरे,सूर्यकांत बारणे,अभय काळे,किशोर कुमठेकर,अरुण हलगे,संतोष गायकवाड यांसह भाजपचे असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

शिबिरात उपाध्याय यांच्या जीवनकार्यावर तसेच त्यांच्या एकात्म मानववाद आणि अंत्योदय या विचारसरणीवर सखोल चर्चा करण्यात आली. शिबिराचे उद्घाटन धर्मेंद्र खांडरे यांच्या हस्ते झाले. “इतिहास व विकास” या विषयावर त्यांनी मार्गदर्शन केले. “वैचारिक अधिष्ठान” या विषयावर गुलाब म्हालस्कर यांनी विचार मांडले, तर “कार्यविस्तार” या विषयावर अविनाश बावरे यांनी मार्गदर्शन केले.

“कार्यपद्धती” यावर भगवान शेळके यांनी माहिती दिली. “अपनी सरकार की उपलब्धियां” या विषयावर सायली बोत्रे यांनी माहिती दिली. “सोशल मीडिया” या विषयावर प्रिया पवार यांनी मार्गदर्शन केले, तर “बुथ व्यवस्थापन” या विषयावर डॉ. ताराचंद कराळे यांनी प्रबोधन केले. विविध सत्रांमधून कार्यकर्त्यांना संघटन बळकटीकरणाचे धडे देण्यात आले.

उपाध्याय यांचे विचार आजही तितकेच प्रासंगिक असून, त्यांच्या एकात्म मानववादाच्या तत्त्वज्ञानातून समाजातील शेवटच्या घटकापर्यंत विकास पोहोचवण्याची प्रेरणा मिळते, असे मत यावेळी व्यक्त करण्यात आले. शिबिरात सहभागी झालेल्या कार्यकर्त्यांनी समाजसेवेचा संकल्प केला.