लोखंडी कोयता बाळगल्याप्रकरणी एकास चाकण पोलिसांनी घेतले ताब्यात
सह्याद्री DIGITAL NEWS - बेकायदेशीर रित्या स्वतः जवळ लोखंडी कोयता बाळगल्याप्रकरणी एकास चाकण पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याचे माहिती वरिष्ठ पोलिस अधीक्षक संजय सोळंके यांनी दिली.
रेवन्नाथ बाबासाहेब खेडकर (वय.३४ वर्षे, नेमणुक चाकण पोलीस ठाणे,पोलीस आयुक्तालय,पिंपरी चिंचवड) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार
प्रथमेश बाळ फड (वय.१९ वर्षे,रा.कुरुळीफाटा,ता. खेड,जि.पुणे.मुळ रा.धर्मपुरी, पोस्ट-अआंबेजोगाई ता- परळी,जि.बीड) याच्यावर गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,चाकण येथील(दि.२२) सायंकाळी साडे सहा वाजण्याच्या सुमारास महात्मा फुले मार्केट यार्डसमोर पी.डब्लुडी ऑफिसचे शेजारील मैदानात प्रथमेश फड याच्याकडे धारधार लोखंडी कोयता बेकायदेशिर रित्या स्वतः जवळ बाळगले स्थितीत मिळून आला आहे.हत्याराबाबत मनाई आदेशाचे उलंघन केलेले म्हणून त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे.