भामा/भिमाचे जल 'गोदा ते नर्मदा' जलयात्रेसाठी रवाना - आमदार बाबाजी काळेंच्या हस्ते कलश पूजन
राजगुरूनगर | राज्य शासनाच्या जलसंपदा विभागातर्फे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जलव्यवस्थापन कृती पंधरवडा २०२६ तसेच जलदिंडी कार्यक्रमांतर्गत ‘गोदा ते नर्मदा जलयात्रा २०२६’ हा महत्वाकांक्षी उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमाच्या पार्श्वभूमीवर कडधे येथील शासकीय विश्रामगृह येथे जलसंवर्धनाचा संदेश जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी एक विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
या कार्यक्रमात पवित्र भामा व भीमा नदीच्या जलाने भरलेले कलश आमदार बाबाजी काळे यांच्या हस्ते पूजन करून ते जलयात्रेत पाठविण्यात आले आहे.
यावेळी चासकमान पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता मोहन जाधवर यांच्याकडे कलश विधिवत सुपूर्द करण्यात आले. या कृतीद्वारे जलसंवर्धन, पाणी व्यवस्थापन आणि लोकसहभाग याबाबत जनजागृती करण्याचा संकल्प व्यक्त करण्यात आला. या उपक्रमामुळे जलसंवर्धनाची चळवळ अधिक बळकट होण्यास मदत होणार असून, जलयात्रेमधून पाणी व्यवस्थापनाबाबत जनतेमध्ये जागरूकता निर्माण होईल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
यावेळी सहाय्यक अभियंता श्रेणी-१, अश्विन पवार, उपविभागीय अधिकारी संतोष शिंदे, सहाय्यक अभियंता शुभम सुसंदरे, शाखा अभियंता अमर तंडे, स्थापत्य अधिकारी संदीप भोसले, सिंचन सहाय्यक वसंत ढोकरे, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक रोशनी सिसुदे, दप्तर कारकून राहुल कराळे यांच्यासह जलसंपदा विभागातील क्षेत्रीय कर्मचारी उपस्थित होते.