चाकण पोलिसांचे विशेष कौतुक;कुविख्यात दरोडेखोरांना पोलिसांनी जीवाची बाजी लावून केले जेरबंद

 0
चाकण पोलिसांचे विशेष कौतुक;कुविख्यात दरोडेखोरांना पोलिसांनी जीवाची बाजी लावून केले जेरबंद
चाकण पोलिसांचे विशेष कौतुक;कुविख्यात दरोडेखोरांना पोलिसांनी जीवाची बाजी लावून केले जेरबंद

चाकण ( पुणे ) : बहुळ ( ता.खेड ) गावातील दरोडा प्रकरणातील दरोडेखोरांना पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांवरच आरोपींनी कोयत्याने जीवघेणा हल्ला चढवला.या हल्ल्यात पोलीस उपायुक्त डॉ.शिवाजी पवार आणि सहायक पोलीस निरीक्षक प्रसन्न जराड जखमी झाले,परंतु जीवाची बाजी लावून चाकण पोलिसांनी त्या दरोडेखोरांच्या मुसक्या अवळल्याने पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी विशेष कौतुक केले आहे.

बहुळ येथे काही दिवसांपूर्वी वृद्ध दाम्पत्याच्या घरात घुसून सहा दरोडेखोरांनी चाकूने हल्ला करून दोन जणांना गंभीर जखमी करत सुरीचा धाक दाखवत लूटमार केली होती.त्यांनी घरातील सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम लुटून धूम ठोकली होती.या घटनेमुळे परिसरात दहशत निर्माण झाली होती.या घटनेनंतर दरोडेखोर चिंचोशी (ता.खेड ) गावात (दि.२ ) मध्यरात्री पुन्हा दरोडा टाकण्याच्या तयारीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्याने पोलीस उपायुक्त डॉ. शिवाजी पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी सापळा रचला.मात्र,दरोडेखोरांना पकडण्याचा प्रयत्न करताच त्यांनी पोलिसांवर थेट कोयत्याने हल्ला चढवला.अचानक झालेल्या हल्ल्यात उपायुक्त डॉ. शिवाजी पवार आणि सहायक पोलीस निरीक्षक प्रसन्न जऱ्हाड जखमी झाले.यावेळी स्वतःचा बचाव करण्यासाठी उपायुक्त डॉ.शिवाजी पवार यांनी प्रत्युत्तरादाखल दोन गोळ्या झाडल्या. त्यातील एक गोळी सराईत गुन्हेगार सचिन भोसले याच्या पायाला लागली असून, त्याला घटनास्थळीच पकडण्यात आले आहे. इतर एक आरोपी अंधाराचा फायदा घेत पळून जात असताना त्याला पाठलाग करून पकडण्यात आले. 

पोलिसांनी जीवाची बाजी लावून कुविख्यात दरोडेखोरांना जेरबंद केले.या दमदार कामगिरीने पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी उप आयुक्त डॉ.शिवाजी पवार आणि सहायक पोलीस निरीक्षक प्रसन्न जराड यांचे विशेष कौतुक केले आहे.

* या ही पोलिसांचे कौतुक -

उपायुक्त डॉ. शिवाजी पवार,उपायुक्त विवेक पाटील, सहा.आयुक्त राजेंद्रसिंह गौर,पोलिस निरीक्षक प्रमोद वाघ, निरीक्षक (गुन्हे) नाथा घार्गे, सहायक निरीक्षक प्रसन्न जराड,गणपत धायगुडे, अंमलदार हनुमंत कांबळे, राजू जाधव,सुनील भागवत,रेवणनाथ खेडकर,किरण घोडके,महादेव बिक्कड,महेश कोळी,शिवाजी चव्हाण,सुनील शिंदे, भैरोबा यादव,उद्धव गर्जे,ऋषीकेश झनकर,सुदर्शन बर्डे.

०००००