रात्रीच्या अंधारात कामगारांना मारहाण करत लुटणाऱ्या टोळक्यास अटक,एकूण ६ गुन्हे उघडकीस

चाकण ( पुणे ) : चाकण औद्योगिक वसाहतमधील कंपनीमधून ड्युटी करून रात्रीच्या वेळी सुटणाऱ्या कामगारांस मारहाण करत लुटणाऱ्या टोळक्यामधील चार जणांना अटक करण्यात आली असून दोन चोरट्यांना तपास सुरू आहे.या टोळक्याचे ६ गुन्हे उघडकीस आणून एकूण २ लाख ४५ हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.
जितेंद्र मोहन वायदंडे ( वय.३१ वर्षे,रा.देहू,ता.हवेली,जि. पुणे ) हे (दि.११/३/२५) रात्री साडे अकरा वाजता कंपनीमधील कामावरून सुट्टी झाल्यानंतर मोटारसायकल वरून घरी जात असताना त्यांना महाळुंगे गावचा हद्दीतील इंडोस्पेस कंपनी परिसरात निर्जनस्थळी अडवून सहा अनोळखी व्यक्तींनी लाथाबुक्क्यानी, चामडी पट्ट्यानी तसेच हॉकी स्टिकणे जबर मारहाण करून लुटल्याप्रकरणी महाळुंगे MIDC पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.या प्रकरणाचा महाळुंगे MIDC पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने अज्ञात आरोपीचा शोध घेत असताना कृष्णा सौराते(वय-१९ वर्षे), वाघजाईनगर, भीमराव मुंडे(वय-२१ वर्षे), नाणेकरवाडी, दीपक भगत(वय-२४वर्षे), वाघजाईनगर, ऋषिकेश माळी (वय-२१वर्षे), नाणेकरवाडी ता. खेड, जि. पुणे यांना अटक करण्यात आली आहे.यांच्याकडून दुचाक्या आणि एक रिक्षा आदी मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.तर इतर दोन फरारी चोरट्यांचा पोलीस शोध घेत आहेत.
सदर कारवाई महाळुंगे MIDC पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन गिते यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक कल्याण घाडगे, पोलीस उपनिरीक्षक अनिस मुल्ला, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राजू कोणकेरी, पोलीस हवालदार अमोल बोराटे, युवराज बिराजदार, विठ्ठल वडेकर, किशोर सांगळे यांच्यासह शिवा लोखंडे, राजेंद्र खेडकर, संतोष वायकर, गणेश गायकवाड,अमोल माटे,मंगेश कदम, राजेंद्र गिरी यांनी केली आहे.