शिवसेना प्रचाराला उभारी – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची चाकणमध्ये भव्य रॅली
सह्याद्री DIGITAL NEWS - नगरपरिषद निवडणुकीची रणधुमाळी शेवटच्या टप्प्यात पोहचली आहे.शिवसेनेनेही जोरदार शक्तिप्रदर्शनाची तयारी केली आहे.उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भव्य प्रचार रॅली चाकणमध्ये होणार असून या रॅलीकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.
शिवसेना पक्षाच्या नगराध्यक्ष पदाच्या अधिकृत उमेदवार मनिषाताई सुरेशभाऊ गोरे आणि सर्व प्रभागातील नगरसेवक पदाचे शिवसेना पक्षाचे अधिकृत उमेदवार यांच्या प्रचारार्थ भव्य रॅली संध्याकाळी साडे चार वाजता चाकण येथे आयोजित करण्यात आली आहे.
रॅलीचा मार्ग एस टी स्टॅन्ड - माणिक चौक - चाकण नगरपरिषद - शनी मंदिर - बाजारपेठ मार्गे - जय महाराष्ट्र चौक जी महात्मा फुले चौक येथे सभा होऊन समारोप होणार असल्याचे माहिती महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाचे सदस्य नितीन गोरे यांनी दिली.
रॅलीसाठी मार्गावर भगवे झेंडे, फलक, बॅनरांनी सजावट करण्यात आली आहे.शिवसैनिकांमध्ये उत्साहाचा शिगोशीग संचार झाला असून मोठ्या प्रमाणावर मोटारसायकल ताफा, ढोल-ताशा पथके आणि महिला आघाडीचे स्वागत पथक यांची तयारी सुरू आहे.
चाकण शहरातील पायाभूत सुविधा,वाहतूक व्यवस्थापन, रस्ते सुधारणा आणि शहराचा आगामी विकास आराखडा हे मुद्दे प्रमुख असतील अशी चर्चा आहे.रॅलीच्या पार्श्वभूमीवर चाकणचे राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, या शक्तिप्रदर्शनानंतर निवडणूक समीकरणांना नवे वळण मिळण्याची शक्यता व्यक्त केली जा
ते.