अपक्ष उमेदवार रोनक विनोद गोरे यांचा शिवसेना पक्षाचे अधिकृत उमेदवारास जाहीर पाठिंबा
सह्याद्री DIGITAL NEWS - चाकण नगरपरिषद निवडणुकीमध्ये प्रभाग क्र.१ मधून अपक्ष उमेदवार म्हणून उभे असलेले रोनक विनोद गोरे यांनी आपली उमेदवारी मागे घेत शिवसेना पक्षाच्या अधिकृत उमेदवारास पाठिंबा जाहीर केला आहे.
याप्रसंगी माजी उपनगराध्यक्ष राजेंद्र गोरे,शिवसेना उपजिल्हाप्रमुख प्रकाश वाडेकर,अशोक भुजबळ,माणिक गोरे, महेंद्र गोरे,नितीन गोरे, बिपीन रासकर,संदेश गीते,अशोक बारवकर, गोरकक्षनाथ कांडगे यांच्या विनंतीनुसार समंजस भूमिका घेतली आहे.
स्वर्गीय माजी आमदार सुरेशभाऊ गोरे यांच्या विचारांचा वारसा जपण्यासाठी रोनक गोरे यांनी शिवसेना पक्षाचे अधिकृत उमेदवार प्रकाश लक्ष्मण गोरे आणि शहरातील सर्व उमेदवारांसह नगराध्यक्षापदासाठी श्रीमती मनिषाताई सुरेशभाऊ गोरे यांना जाहीर पाठिंबा दिला आहे.