खेड तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीत पुन्हा भूकंप

राजगुरूनगर ( पुणे ) : खेड तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीत हमाल / मापाडी संवर्गातून संचालक असलेले सयाजी माणिक मोहिते यांचा हमाल परवाना रद्द करण्यात आल्याचा आदेश खेड तालुका सहकारी संस्थांचे सहाय्यक निबंधक सचिन सरसमकर यांनी सोमवारी (दि १०) ला दिला आहे.यामुळे मोहिते यांचे संचालक पद धोक्यात आले का ? अशी चर्चा रंगू लागली आहे.
खेड कृषि उत्पन्न बाजार समितीचे संचालक सयाजी मोहिते हे माजी आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या गावातील असुन त्यांच्याच पॅनल मधुन दोनदा निवडणुन निवडून आले आहेत. सयाजी मोहिते यांच्या परवाना दाखल्यावर बापु बाळु थिगळे यांनी आक्षेप घेतला होता. त्याची पडताळणी करण्यात आली. संचालक सयाजी मोहिते यांनी मागील निवडणुकी दरम्यान दाखला नुतनीकरण केला. मात्र त्यासाठी किती काम केले आणि किती मोबदला मिळवला याबाबत माहिती दिली नसल्याचे निदर्शास आले. विपर्यास करून दाखला मिळवला असा ठपका ठेवत सचिन सरमरकर यांनी महाराष्ट्र कृषि उत्पन्न खरेदी विक्री (विकास व विनियमन) अधिनियम १९६३ व नियम १९६७ मधील नियम ७ (३) मधील नमुद अटींचा भंग केला आहे. असा निष्कर्ष नोंदवून मोहिते यांचा दाखला रद्द ठरवण्यात आला आहे.
बाजार समितीचे संचालक सयाजी मोहिते हे माजी आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या गटातून बाजार समितीचे सभापती विजयसिंह शिंदे पाटील यांच्या सत्ताधारी गटात सहभागी झाले आहेत.
* आमच्या गटातील संचालक अशोक राक्षे यांना यापूर्वी अशाच प्रकारे 'टार्गेट' करण्यात आले होते.आता सयाजी मोहिते यांचा परवाना रद्द झाल्याने त्यांचे संचालक पद अथवा बाजार समितीच्या राजकिय घडामोडींवर कोणताही परीणाम होणार नाही.याबाबत न्यायालयात दाद मागितली जाणार आहे. _ विजयसिंह शिंदे पाटील,सभापती