चाकणच्या विकासासाठी कटिबद्ध - शिवसेनेच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार मनीषा गोरे
सह्याद्री DIGITAL NEWS - नगरपरिषद निवडणुकीत शिवसेना (शिंदे गट ) पक्षाच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार म्हणून मनीषा सुरेशभाऊ गोरे यांच्या उमेदवारीने चाकणच्या राजकारणात नवचैतन्याची लाट उसळली आहे. विकासाच्या मुद्द्यांवर ठाम भूमिका, संघटनातील सक्रिय सहभाग आणि सर्वसामान्यांपर्यंत पोहोचणारी त्यांची सहज,स्पष्ट शैली ही त्यांची मोठी ताकद मानली जात आहे.
शिवसेना पक्षाच्या चाकण नगरपरिषद नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार मनिषा सुरेशभाऊ गोरे यांनी आपल्या पक्षाचे प्रभाग क्र.३ अ चे उमेदवार सुवर्णा शाम राक्षे,प्रभाग क्र.३ ब चे उमेदवार अनिल लोहकरे,प्रभाग क्र.६ अ चे उमेदवार स्वाती संतोष लेंडघर, प्रभाग क्र.६ ब चे उमेदवार हर्षद लेंडघर यांच्या प्रचाराचा दौरा महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ सदस्य नितिन गोरे यांच्यासह शेकडो महिला,युवकांनी प्रचारात सहभाग घेतला होता.
औद्योगिक वसाहतीच्या झपाट्याने वाढणाऱ्या विस्तारामुळे चाकण शहर अनेक मूलभूत अडचणींना सामोरं जात आहे. वाहतूक कोंडी, पाणीपुरवठा, ड्रेनेज व्यवस्थेतील त्रुटी, घनकचरा व्यवस्थापन अशी अनेक आव्हानं दैनंदिन जीवनात डोके वर काढत आहेत. या सर्व प्रश्नांवर ठोस उपाययोजना राबवून चाकणचा चेहरा बदलण्याचा निर्धार मनीषा गोरे यांनी व्यक्त केला आहे.
स्थानिक महिलांचा मोठा पाठिंबा,तरुणांमध्ये वाढती लोकप्रियता आणि घराघरात पोहोचलेला पक्षाचा संपर्क यामुळे गोरे यांना चांगली गती मिळत असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. “चाकणच्या सर्वांगीण विकासासाठी प्रामाणिकपणे काम करू”, असा विश्वास त्यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधताना व्यक्त केला.
शहराला स्वच्छ, सुरक्षित आणि सुसज्ज बनविण्यासाठी तळागाळापासून पुढे येऊन काम करण्याची तयारी असल्याचे सांगत मनीषा गोरे यांनी निवडणूक प्रचाराची सुरुवात जोरदार केली आहे. चाकणकरांच्या वाढत्या अपेक्षांवर मात करून विकासाची नवी वाट चोखाळण्याची तयारी शिवसेनेच्या या उमेदवाराने दाखवली आहे.
शिवसेना मुख्य नेते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून आजपर्यंत स्वर्गीय माजी आमदार सुरेशभाऊ गोरे आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ सदस्य नितीनभाऊ गोरे यांच्या पाठपुराव्यामुळे मुख्यमंत्री सहायता निधीच्या माध्यमातून गरजू रुग्ण यांना मदत,आयुष्यमान आरोग्य कार्ड काढून देऊन कुटूंबाना आधार आदी योजना नागरिकापर्यंत पोहोचवल्या आहे.