खालुंब्रे ते फेज -१ रस्ता मजबूत होणार; PMRDA निधीची तरतूद;महाळुंगे - नाणेकरवाडी गटातील विकासकामांचे भूमिपूजन

 0
खालुंब्रे ते फेज -१ रस्ता मजबूत होणार; PMRDA निधीची तरतूद;महाळुंगे - नाणेकरवाडी गटातील विकासकामांचे भूमिपूजन

चाकण (पुणे) : खेड तालुक्यातील महाळुंगे - नाणेकरवाडी जिल्हा परिषद गटातील प्रलंबित रस्ते विकास कामांना गती देण्यात आली असून,पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (PMRDA) माध्यमातून निधीची तरतूद करण्यात आली आहे.

माजी आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली या रस्ते विकास कामाचे उद्घाटन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते नारळ वाढवून करण्यात आले. 

हुंदाई चौकाकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्याची दुरवस्था झाली होती.याबाबत नाणेकरवाडी - महाळुंगे जिल्हा परिषद सदस्य गणेश बोत्रे यांनी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (PMRDA) कडे वेळोवेळी पाठपुरावा करून निधीची मंजुरी मिळवली आहे.त्यामुळे खालुंब्रे ते फेज १ या ७५० मीटर अंतराच्या रस्त्याच्या मजबुतीकरणाचे काम सुरू करण्यात आले आहे. यामुळे औद्योगिक क्षेत्रातील कंपन्यांकडे जाणारी जड वाहतूक,शेतकरी आणि स्थानिक नागरिकांचा प्रवास अधिक सुलभ होणार आहे.

माजी आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषद सदस्य गणेश बोत्रे आणि पंचायत समिती सदस्या अश्विनी तरस हस्ते खालुंब्रे चौकात नारळ वाढवून हा उद्घाटन करण्यात आले, यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

* 'जल जीवन मिशन'चा आढावा -

विकास कामांच्या उद्घाटनानंतर जिल्हा परिषद सदस्य गणेश बोत्रे यांनी 'जल जीवन मिशन' अंतर्गत सुरू असलेल्या कामांची पाहणी केली. गावातील पाणीपुरवठा योजनांचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याचे आदेश त्यांनी संबंधित ठेकेदारांना दिले आहेत.

"काही ठिकाणी कामे अंतिम टप्प्यात असून, येत्या ४-५ दिवसांत खालुंब्रे येथील पाणीपुरवठा योजनेचेही लोकार्पण करण्यात येईल," अशी माहिती यावेळी लोकप्रतिनिधींनी दिली. - गणेश बोत्रे, जि. प. सदस्य. 

या कार्यक्रमाप्रसंगी परिसरातील आजी-माजी सरपंच, पंचक्रोशीतील महिला-पुरुष मंडळी आणि विविध संस्थांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. रस्ते आणि पाण्याचे प्रश्न सुटत असल्याबद्दल स्थानिक नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.