कठीण परीस्थितीत यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्याचा गुणगौरव

पिंपरी चिंचवड : वूई टुगेदर फाउंडेशन नेहमीच समाजातील शेवटच्या घटकापर्यंत जाऊन जवेगवेगळे उपक्रम घेत असते.असाच एक उपक्रम म्हणजे! अत्यन्त कठीण परिस्थितून १० वी आणि १२ वीमध्ये चांगले मार्क मिळवून उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्याचा गुणगौरव समारंभ चिंचवड येथे पार पडला.
पिंपरी चिंचवड मधील रात्रशाळा,श्रीराम विद्यालय,घरकाम करणाऱ्यांची मुले,काही सहारा नसलेली मुले,वॉचमेन,रिक्षा चालक आदी घटकामधील गुणवंत विद्यार्थ्यांना शालेय साहित्य देऊन सत्कार तर केला.तसेच त्यांना योग्य मार्गदर्शन मिळावे म्हणून जेष्ठ शास्रज्ञ डॉ.अशोक गोविंद नगरकर यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.
फाउंडेशनचे अध्यक्ष मधुकर बच्चे,सलीम सय्यद, सहसचिव मंगला डोळे - सपकाळे,उपाध्यक्षा सोनाली मन्हास,सचिव जयंत कुलकर्णी,सहसचिव मंगला डोळे - सपकाळे,खजिनदार दिलीप चक्रे,सलीम सय्यद,संस्थापक क्रातिकुमार कडुलकर,सल्लागार रवींद्र सांगडे,दारासिंग मन्हास, जयंत राऊत,रवींद्र काळे,रवींद्र इंगळे,विलास गटने, शंकर कुलकर्णी,अपर्णा कुलकर्णी,जगदीश खोडके,अनिल पोरे,बाळासाहेब जगताप,अरविंद पाटील,परमानंद सोनी,खुशाल दुसाने,श्रीनिवास जोशी,दिलीप पेटकर,के रंगराव,सदाशिव गुरव, उदय कुलकर्णी,नंदकुमार वाडेकर,हनीफ सय्यद, उल्हास दाते,साधना बापट,भास्कर पाखले,रवींद्र शेटे,आसावरी बच्चे आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपाध्यक्षा सोनाली मन्हास यांनी सूत्रसंचालन केले तर सचिव जयंत कुलकर्णी यांनी आभार मानले.