पोदार इंटरनॅशनल प्रशालेचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न
चाकण (पुणे) : पोदार इंटरनॅशनल स्कुल,रोहकल ( ता.खेड ) या प्रशालेच शैक्षणिक वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात साजरे करण्यात आले.यामध्ये जगताला शांततेचा संदेश देणारे प्रभू श्रीकृष्ण यांच्या जीवनावर आधारलेला 'कृष्ण कथाये'चे नाट्य गीताचे आयोजन करण्यात आले होते.
याप्रसंगी पिंपरी चिंचवड महानगर पालिकेचे असिस्टंट कमिशनर अजिंक्य येले,इनकम टॅक्सचे डेप्युटी कमिशनर सदानंद कसल्लू,इस्कॉनचे मदन सुंदर दास,रेडिओ जॉकी शोनाली,अभिजीत महाजन,डी.एस.जे फ्रँकलीन,प्राचार्य विशाल जाधव,मंगेश जगताप,सुधांशु नाईक,मुनीश शर्मा,अनामिका मगरडे,शेहनाज कोटार,सिमरन कौर,निता कुमार,निलेश जाधव,दैनिक लोकमतचे पत्रकार चंद्रकांत मांडेकर,पुढारीचे पत्रकार दत्तात्रय भालेराव,बिपीन महाजन आदींसह पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दोन दिवस चालल्या या कार्यक्रमामध्ये प्रभू श्री कृष्णाच्या विविध नटखट लिलांचे नाट्य गीतांच्या माध्यमातून अवलोकन करण्यात आले.या 'कृष्ण कथाये' मध्ये प्रशालेतील इयत्ता पहिली ते नववीच्या तब्बल अकराशे विध्यार्थ्यांनी सक्रिय सहभाग घेतला.कार्यक्रमामध्ये रासलीला व गोवर्धन पर्वत हे खास आकर्षण ठरले.वर्षभरात प्रशालेतील विध्यार्थ्यांनी सहभाग घेतलेल्या निरनिराळ्या उपक्रम शैक्षणिक प्रगती, चित्र,शिल्प,नृत्य,नाट्य,गायन,साहित्य,क्रीडा,समाजसेवा आदींमध्ये केलेल्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल विद्यार्थ्यांना पुरस्काराने गौरविण्यात आले.
उत्कृष्ठ अध्यापन डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन पुरस्कार सायन्स विभाग प्रमुख पूनम जाधव, मल्टीटास्किंग टीचर पुरस्कार पूर्णिमा तिवारी,डेडिकेटेड टीचर अनुप्रिया कड,सब्जेक्ट मास्टरी उपासना आंधळे,बेस्ट ऍडमिन संतोष चव्हाण, सुखदेव होजगे,सायली कदम,बेस्ट सिक्युरिटी उत्तम ठोंबरे,बेस्ट अटेंडंट अनिता कडलग,हाउस किपींग स्टाफ मेनका कड यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विवेक पिसाळ आणि पुनम जाधव यांनी केले तर आभार उपप्राचार्या शीतल जयस्वारा व शिक्षिका पूजा कदम यांनी मानले.