कंपनीतून स्पेअर पार्टची चोरी करणाऱ्या दोन जणांना अटक; एक जण फरार

 0
कंपनीतून स्पेअर पार्टची चोरी करणाऱ्या दोन जणांना अटक; एक जण फरार

चाकण (पुणे) : कंपनीतील माल वाहतूक करणाऱ्या चारचाकी वाहनातून इतर दोन जणांच्या मदतीने पावणे दोन लाख रुपयांचे दुचाकीचे इलेक्ट्रॉनिक स्पेअर पार्ट चोरी करताना सुरक्षा रक्षकाने रंगेहाथ पकडले असल्याची घटना (दि.२२) मध्यरात्री महाळुंगे एमआयडीसीमधील एका कंपनीत घडली आहे.

 जोगिंदर रामप्रकाश सिंग (वय.५५ वर्षे,रा.रहाटणी, ता.हवेली,जि.पुणे) यांनी म्हाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून ओंकार खंडू जाधव (वय.२४ वर्षे,रा.कशाळ,ता. मावळ),दिनेश बंडु लष्करे (वय.२७ वर्षे,रा. अनसुटे,ता.मावळ,जि.पुणे), सोमनाथ जगताप (रा.टाकवे,ता.मावळ,जि.पुणे) या तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून ओंकार आणि दिनेश यांना अटक करण्यात आली आहे.

 पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,चाकण औद्योगिक वसाहतमधील महाळुंगे गावाच्या हद्दीतील सी बर्ड लॉजी सोल्युशन कंपनीमध्ये क्रमांक ( एमएच.१२/ई. एफ ६५६६) या चारचाकी गाडीमध्ये ओंकार हा माल भरून घेऊन जात असताना गाडीचा चालक ओंकार याने दिनेश आणि सोमनाथ दोन साथीदारांच्या मदतीने कंपनीतील बजाज पल्सर या दुचाकीचे इलेक्ट्रॉनिक सीडीआय आणि रेग्युलेटर असे १ लाख ७० हजार १०० रुपये किंमतीचे पार्ट सदर गाडीत भरुन नेत असताना कंपनीतील सेक्युरीटी सुपरवायझर राजा झल्लुराम यादव यांनी त्यांची एमटी डॉक या ठिकाणी तपासणी केली असता चोरी करतना दोन जणांना रंगेहाथ पकडले असून सोमनाथ हा पळून गेला आहे.पुढील तपास महाळुंगे एमआयडीसी पोलीस करत आहेत.