मी इथला भाई आहे;मला दोन हजार रुपये महिन्याला द्यावे लागेल;कोयत्याचा दाखवला धाक

चाकण ( पुणे ) : मी इथला भाई आहे,तुला दारूचे दुकान चालवायचे असल्यास मला महिन्याला दोन हजार रुपये द्यायचे असे म्हणत कोयत्याचा धाक दाखवून दहशत निर्माण केल्याची घटना निघोजे (ता.खेड ) येथे (दि.८) ला घडली आहे.
आनंद सुखदेवप्रसाद शर्मा (वय.२१वर्षे,व्यवसाय मॅनेजर रा.निघोजे,कॅपिटल सिटी,ता.खेड जि.पुणे) यांनी म्हाळुंगे एमआयडीसी पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून रामदास हनपुडे (वय.३८ वर्षे,पुर्ण नाव पत्ता माहीत नाही) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,आरोपी याने तू मला ओळखत नाही का ? मी रामदास हनपुडे आहे,माझ्यावर किती गुन्हे आहेत तुला माहीत आहे का ? मी इथला भाई आहे असे म्हणून फिर्यादीला शिवीगाळ व धक्काबुक्की करून हाताने लाथाबूक्यांनी मारहाण केली.तसेच रिक्षातील कोयता काढुन तुला दारूचे दूकान चालवायचे असेल तर मला महीन्याला दोन हजार रुपये आणि फुकट दारू द्यावी लागेल अशी खंडणीची मागणी करुन हातातील कोयता हवेत फिरवुनमध्ये कोण आले तर एक एकेला जिवे मारील अशी धमकी देवुन दहशत केली.
महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन गीते यांच्या मार्गदर्शनाखाली येथील पोलीस पुढील तपास करीत आहेत.