चोरट्याने लाखभर रुपयांचे लोखंडी बांधकाम साहित्यावर मारला डल्ला

चाकण ( पुणे ) : बांधकामासाठी लागणारे एक लाख रुपये किंमतीचे बांधकाम साहित्य चोरट्याने चोरल्याची घटना चाकण जवळील कडाचीवाडी ( ता.खेड ) येथे (दि.२७ ते १ ) दरम्यान घडली असल्याचा गुन्हा चाकण पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे.
दत्तात्रय वामनराव खांडेभराड (वय.४५ वर्ष,धंदा व्यवसाय रा.कडाचीवाडी,चाकण ता.खेड,जि.पुणे) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कडाचीवाडी येथील पी के कॅम्पस येथे फिर्यादी यांचे बांधकाम साहित्य ठेवण्यात आले होते.अज्ञात इसमाने स्वतःच्या आर्थिक फायद्याकरिता ९६,९६०/- रुपये किंमतीचे बांधकामाचे लोखंडी साहीत्य चोरुन नेले होते.चाकण पोलिसांनी तांत्रिक माहितीच्या आधाराने ओमकार प्रकाश हटकर (वय ).२७,वर्षे,रा.वाघोली,ता,हवेली,जि.पुणे,मुळ रा.माळवागड,ता.महागाव,जि.यवतमाळ) यास अटक करून अधिक चौकशी केली असता त्याने गुन्हा केला असल्याचे कबूल केले आहे.पुढील तपास चाकण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली येथील पोलीस करत आहेत.