कंपनीचे स्पेअर पार्ट चोरून नेताना चालकास रंगेहाथ पकडले

 0
कंपनीचे स्पेअर पार्ट चोरून नेताना चालकास रंगेहाथ पकडले

चाकण ( पुणे ) : कोणतीही परवानगी नसताना कंपनीचे दुचाकीचे कॉस्टिंग स्पेअर पार्ट वाहनांतून चोरून नेणाऱ्या वाहनचालकास कंपनी प्रवेशद्वारावरच सुरक्षा रक्षकांनी रंगेहाथ पकडल्याची घटना (दि. ३१ मार्च २५) ला औद्योगिक वसाहतीत उघडकीस आली आहे.

 संजीवकुमार भाषकर राऊत (वय.४५वर्ष,रा. नाणेकरवाडी,चाकण,ता.खेड,जि.पुणे) यांनी म्हाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून वैभव वामनराव संगेवार (वय.२६ वर्षे, रा.नाणेकरवाडी,चाकण,ता.खेड जि.पुणे) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  याबाबत अधिक माहिती अशी की,चाकण औद्योगिक वसाहतमधील अॅडवीक हाय टेक प्रा.लि.(वासुली,ता.खेड,जि.पुणे) या कंपनीचे दुचाकीचे कॉस्टिंग जॉब बाहेर नेण्याची कोणतीही परवानगी नसताना वैभव याने ताब्यातील अशोक लिलॅन्ड दोस्त गाडी नंबर (एम.एच.१४/जी.डी.९०४६) या गाडीमध्ये सात हजार एकशे शह्याऐंशी रुपये किंमतीचे २२७ जॉब चोरी करून घेऊन जात असताना कंपनीच्या प्रवेशद्वारावर आढळून आला आहे.म्हाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन गीते यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.