म्हणूनच वारे गुरुजी व त्यांची शाळा ठरते वेगळी ! प्रत्येक विद्यार्थ्यांच्या घरी आता सेंद्रिय परसबाग

 0
म्हणूनच वारे गुरुजी व त्यांची शाळा ठरते वेगळी !  प्रत्येक विद्यार्थ्यांच्या घरी आता सेंद्रिय परसबाग
म्हणूनच वारे गुरुजी व त्यांची शाळा ठरते वेगळी !  प्रत्येक विद्यार्थ्यांच्या घरी आता सेंद्रिय परसबाग

राजगुरुनगर ( पुणे ) : भारतीय परंपरेनुसार पंचकोश आधारीत शिक्षण पध्दतीत पहिला कोश "अन्नमय कोश" असून सध्या सर्वात दुर्लक्षित व मानवी जीवनावर सर्वाधिक परिणाम करणारा कोश आहे.यामुळेच आमच्या शाळेतील सर्व विद्यार्थ्यांच्या घरी येणाऱ्या शैक्षणिक वर्षांपासून "सेंद्रीय परसबाग विकसित करण्याचा निर्णय घेतला आहे.

   आपल्या अनोख्या शैक्षणिक उपक्रमांमुळे नावलौकिक मिळवलेले वारे गुरुजी सध्या खेड तालुक्यातील कनेरसर येथील जालिंदरनगर जिल्हा परिषद शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत आहेत.या शाळेत शिक्षक म्हणून रुजू झाल्यापासून वारे गुरुजींनी कनेसर शाळेचा व येथील विद्यार्थी व पालकांच्या मानसिकतेत देखील बदल घडविण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.वारे गुरुजी कनेरसर जिल्हा परिषदेत शिक्षक म्हणून आले हे समजल्यापासूनच शाळेची पट संख्या वाढण्यास सुरूवात झाली. शाळेत विविध नाविन्यपूर्ण उपक्रम सुरू असून, याचाच एक भाग म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्यांच्या घरी सेंद्रिय परसबाग विकसित करण्याचा निर्णय आहे. वारे गुरूजींच्या शाळेत येणा-या शैक्षणिक वर्षांपासून हा उपक्रम सुरू होणार असून,याची पुर्व तयारी कशी करायची, परसबागेसाठी जमीन कशी तयार करायची, सेंद्रिय परसबाग म्हणजे नेमके काय याबाबत माहिती घेण्यासाठी विद्यार्थी व पालक यांची एकत्र वडगाव पाटोळे येथे दादाभाऊ जाचक यांच्या नैसर्गिक (एसपीके) शेतीला भेट दिली. 

* भारतीय परंपरेनुसार पंचकोश आधारीत शिक्षण पध्दतीत पहिला कोश "अन्नमय कोश" हा आहे. सध्या अतिप्रचंड रासायनिक खते व औषधाचा वापर होत असल्याने हा अन्नमय कोश व त्यामुळेच मानवाचे जीवन व अस्तित्वच धोक्यात आले आहे. याबाबत आता खर तर शाळांमधून विद्यार्थी व पालकांमध्ये जनजागृती झाली पाहिजे. नैसर्गिक व सेंद्रिय शेतीचे महत्त्व लोकांना पटवून दिले पाहिजे. यासाठीच आमच्या शाळेने प्रत्येक विद्यार्थ्यांच्या घरी " नैसर्गिक, सेंद्रिय परसबाग " विकसित करण्याचा निर्णय घेतला आहे. - वारे गुरुजी, जिल्हा परिषद शाळा,कनेरसर 

* वारे गुरुजी यांच्या कनेरसर शाळेतील विद्यार्थी व पालकांनी मंगळवारी आपल्या नैसर्गिक (एसपीके) शेताला भेट दिली. विद्यार्थ्यांना नैसर्गिक शेतीबद्दल असलेली उत्सुकता त्यांनी विचारलेल्या विविध प्रश्नांतून दिसून आली. विद्यार्थ्यांसोबत त्यांचे पालक देखील शेताला भेट देण्यासाठी आले होते. नवीन व पुढची नैसर्गिक शेतीबद्दल जागृत झाली तर भविष्यात नक्कीच सकारात्मक बदल दिसून येतील व जास्तीत जास्त लोक नैसर्गिक शेतीकडे वळतील. - दादाभाऊ जाचक,नैसर्गिक शेतकरी , वडगाव पाटोळे,खेड.