कंपोस्ट खड्डा भरू आपले गाव स्वच्छ ठेवू अभियानाचा भांबोली येथे शुभारंभ
चाकण ( पुणे ) : एक मे महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग महाराष्ट्र शासन व स्वच्छ भारत मिशन अंतर्गत कंपोस्ट खड्डा भरू आपलं गाव स्वच्छ ठेवू अभियानाचा शुभारंभ ग्रामपंचायत भांबोली (ता.खेड ) येथे करण्यात आला. गावातील सुका आणि ओला कचरा ग्रामपंचायतच्या मार्फत गोळा करून त्याचे वर्गीकरण करून त्यापासून खत निर्मिती केली जाते.यामुळे गावचा परिसर स्वच्छ होण्यास मदत होणार आहे.
यावेळी आमदार बाबाजी काळे,पंचायत समितीचे ग्रामविकास अधिकारी विशाल शिंदे,विस्तार अधिकारी किसन मोरे,सरपंच शितल पिंजण,उपसरपंच अर्जुन राऊत,माजी उपसरपंच शरद निखाडे,भाजपा युवा मोर्चाचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष काळूराम पिंजण, ग्रामपंचायत अधिकारी विकास विसे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
एमआयडीसी आणि पीएमआरडीकडून कचरा व्यवस्थापनासाठी जागा उपलब्ध करण्याची हमी देण्यात आली. त्याचप्रमाणे भांबोली गावातील आठवडे बाजाराची जागा जिल्हा परिषद मार्फत ग्रामपंचायतला मिळवून देण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे आमदार काळे यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे शरद निखाडे यांनी सूत्रसंचालन केले तर काळुराम पिंजन यांनी आभार मानले.