चाकणला साडे सात लाख रुपयांचा गांजा पकडला; दोन जणाला अटक

चाकण ( पुणे ) : अकरा किलो ८१० ग्रॅम वजनाचा असा सात लाख,६५ हजार ८०० रुपये किमतीचा गांजा विक्रीसाठी जवळ बाळगल्या प्रकरणी चाकण पोलिसांनी दोन जणांवर गुन्हा दाखल केला आहे.संतोषनगर,भाम फाटा ( ता. खेड) गावच्या हद्दीत शनिवारी ( दि.३ जून ) रात्री साडे दहा वाजण्याच्या सुमारास ही कारवाई करण्यात आल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांनी दिली.
सलमान हसन सय्यद (वय.२९ वर्षे,रा,मंचर,ता.आंबेगाव,जि.पुणे) आणि सनी विजय शहा (वय.२१ वर्षे, रा.नारायणगाव,ता.जुन्नर,जि.पुणे) असे गुन्हा दाखल करून अटक करण्यात आलेल्यांची गांजा विक्रेत्यांचे नावे आहेत.
पिंपरी - चिंचवड पोलीस आयुक्तालयातील अंमली पदार्थ विरोधी पथकाचे पोलीस शिपाई रणधीर रमेश राणे यांनी याप्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. अधिक वृत्त असे की, पुणे नाशिक रस्त्यावरील संतोषनगर,भाम फाटा (ता.खेड ) समोर असलेल्या हॉटेल गन्धर्व नावाचे हॉटेलचे समोर असलेल्या मोकळया जागेमध्ये आरोपी सलमान आणि सनी हे त्याचे ताब्यात एकूण साडे सात पाच लाख रुपये किंमतीचा ११ किलो ८१० ग्रॅम गांजा हा अंमली पदार्थ, मोबाईल व रोख रक्कम असा माल बेकायदेशिर रित्या विक्री करीता कब्जात बाळगताना मिळून आला आहे.त्याचेकडे मिळून आलेला गांजा हा अंमली पदार्थ त्याने आरोपी विशाल मोहिते (नाव पत्ता माहिती नाही) याचे कडून आणला आहे.पुढील तपास चाकण पोलीस करत आहेत.