चाकणमधील श्रीरामनगर येथे श्री गणेश जयंती सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न
चाकण ( पुणे ) : येथील श्रीरामनगर येथे श्री गणेश जयंती उत्सव मोठ्या थाटा - माटात पार पडला. यावेळी श्रींचा अभिषेक झाला.त्यानंतर गणेश याग होम हवन संपन्न झाले.
उद्योजक साहेबराव कड यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेल्या श्री गणेश जयंती उत्सवात होम हवनास सपत्नीक सौ व श्री डॉ.भरत राऊत, सौ व श्री माउलीकाका मुंगसे,सौ व श्री सुनील कापसे,सौ व श्री.प्रभाकर हराळ-पाटील,सौ व श्री अरविंद कुमावत या मान्यवरांच्या हस्ते होम हवन संपन्न झाले.
त्यानंतर पारंपरिक ढोल ताश्यांच्या गजरात श्रींची पालखी मिरवणूक काढण्यात आली.यावेळी श्रीरामनगरमधील महिलानी पालखी मार्गावर सुरेख रांगोळ्या काढल्या होत्या.महिला,लहान मुले यांनी एकाच रंगाचा पोशाख परिधान करून कार्यक्रमाची शोभा वाढली होती.
पालखी मिरवणुकीनंतर श्रींची आरती संपन्न झाली त्यानंतर सर्वांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.या कार्यक्रमासाठी श्रीरामनगर तसेच आजू बाजूच्या परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या वेळी चाकण नगरपरिषदेच्या प्रथम नगराध्यक्षा पुजाताई कड-चांदेरे,पुणे जिल्हा कबड्डी असोसिएशनचे संचालक किरण चांदेरे,श्रीरामनगर फेडरेशनचे अध्यक्ष श्री.साहेबराव कड,शिवसेना उपतालुकाप्रमुख गणेशशेठ आरगडे,श्रीरामनगर फेडरेशनचे उपाध्यक्ष माउली काका मुंगसे,मुक्तीधाम संस्थेचे खजिनदार गंगाधर जपे,रोटरीचे माजी अध्यक्ष सुभाष वाडेकर,अजय मनसुक आदींचे सहकार्य लाभले.