राज्यस्तरीय तालुका पत्रकार संघ अध्यक्ष मेळाव्याची तयारी अंतिम टप्प्यात

आळंदी ( पुणे ) : मराठी पत्रकार परिषद मुंबईच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय तालुका पत्रकार संघ अध्यक्ष मेळावा तसेच आदर्श तालुका पुरस्कार वितरण सोहळ्याची तयारी अंतिम टप्प्यात आली असून सेलू तालुका पत्रकार संघाचे पदाधिकारी मोठ्या जोमाने कामाला लागले आहेत.
मराठी पत्रकार परिषदेच्या राज्यस्तरीय आदर्श तालुका पुरस्कार वितरण सोहळा तसेच राज्यातील २५६ तालुक्यातील तालुका अध्यक्षांचा मेळावा १ फेब्रुवारी २०२५ रोजी सेलू येथील साई नाट्यगृह होणार आहे. या मेळाव्याची जोरदार तयारी सेलू तालुका पत्रकार संघाने केली आहे.
मराठी पत्रकार परिषदेचे सरचिटणीस प्रा. सुरेश नाईकवाडे,जिल्हाध्यक्ष प्रभू दिपके,कार्याध्यक्ष लक्ष्मण मानोलीकर यांनी सेलू येथे भेट देऊन तयारीची पाहणी केली.
यावेळी जिल्हा प्रशासनाच्या वतीने परभणी जिल्ह्यातील ऐतिहासिक स्थळाची माहिती देणारे प्रदर्शनही या मेळाव्यात लावण्यात येणार आहे.त्या संदर्भात जिल्हाधिकारी कार्यातील माहिती अधिकारी सुनील पोटेकर हेही यावेळी उपस्थित होते.
तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष लक्ष्मण बागल, जिल्हा सरचिटणीस मोहम्मद इल्यास,मोहसीन अहमद,संजय मुंडे,कांचन कोरडे,नीरज लोया, सतीश आकात आदी पदाधिकाऱ्यांना यावेळी विविध सूचना देण्यात आल्या,निवास व्यवस्था, भोजन व्यवस्था,नाट्यगृहातील व्यवस्था माहिती देण्यात आली.
सोहळ्याचे स्वागत अध्यक्ष माजी नगराध्यक्ष विनोद बोराडे हे आहेत.कार्यक्रमाला सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाठ,पालकमंत्री मेघनाताई बोर्डीकर उपस्थित राहणार आहेत.परिषदेचे मुख्य विश्वस्त एस. एम देशमुख,विश्वस्त किरण नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली मेळाव्याची तयारी करण्यात येत असून आज परिषदेच्या वतीने अंतिम तयारी पुन्हा एकदा हात फिरवण्यात आला.
( अर्जुन मेदनकर, आळंदी )