नाणेकरवाडी येथील बौध्द कुटुंबीयाच्या वतन जमिनी लाटल्या; स्वाभिमानी रिपब्लिकन महासभेचे जाहीर धरणे आंदोलन
चाकण ( पुणे ) : नाणेकरवाडी (ता.खेड ) येथील बौध्द कुटुंबीयाच्या महार वतन जमिनी लाटल्याप्रकरणी ऑर्चिड वास्तू निर्माण संस्था तर्फे कल्याण जगन्नाथ जाधव तसेच तलाठी आणि तत्कालीन मंडल अधिकारी यांच्यावर ॲट्रॉसिटी ॲक्ट अंतर्गत गुन्हे गुन्हे दाखल करावेत यासाठी तहसील कार्यालय खेड येथे स्वाभिमानी रिपब्लिकन महासभेने (दि.८) रोजी जाहीर धरणे आंदोलन करण्यात आले.
संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष हरेशभाई देखणे यांच्या मार्गदर्शनाखाली हे आंदोलन करण्यात आले.याप्रसंगी कार्याध्यक्ष सदाशिव आढाव, पश्चिम महाराष्ट्र संपर्कप्रमुख तुषार जगताप,दिलीप पालवे,कैलास केदारी,विशाल खंडागळे,निलेश ठाकूर,नितीन गायकवाड, सुभाष पवळे,विकास शिंदे,संदीप खंडागळे,सोनू काळे,रवी सावंत,अतुल देखणे,सागर शिंदे,दत्ता गायकवाड,सचिन देखणे,स्वाती गायकवाड,अनमोल खंडागळे,अजित गोतरणे,काळूराम शिंदे आदी उपस्थित होते.
औद्योगिक क्षेत्रामुळे तालुक्यात जमिनीला सोन्याचा भाव मिळत आहे.खरेदी विक्री प्रकरणात जास्त करून एससी - एसटी समाजातील शेतकऱ्यांची फसवणूक झाल्याची मोठ्या घटना घडल्या आहेत.नाणेकरवाडी येथील बौध्द कुटुंबीयाची महार वतन जमिनी लाटल्याप्रकरणी ऑर्चिड वास्तू निर्माण संस्था तर्फे कल्याण जाधव याने तलाठी आणि तत्कालीन मंडल अधिकाऱ्यांच्या संगनमताने सात बारावरून शेतकऱ्यांची नावे गायब केली असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.
* या प्रकरणामध्ये दोषी असणारे महसूल विभागाचे अधिकारी तसेच ऑर्चिड वास्तू निर्माण संस्था पुणे तर्फे कल्याण जाधव याच्यावर तात्काळ अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियमातील कायद्या अंतर्गत कारवाई करून शेतकऱ्यांची नावे ७/१२पत्रिकी दाखल करण्यात यावेत. - हरेशभाई देखणे,प्रदेश अध्यक्ष,स्वाभिमानी रिपब्लिकन महासभा.
* या आंदोलनाला शेतकरी नेते गजानन गांडेकर, राजजी गुजर प्रतिष्ठान महाराष्ट्र कार्याध्यक्ष रज्जाक शेख,रिपब्लिकन श्रमिक ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष संतोषनाना डोळस,राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक आघाडीचे चाकण शहराध्यक्ष मोबीनभाई काझी तसेच शेतकरी नेते सुभाष पवळे इत्यादींनी आंदोलनाला पाठिंबा दिला.