कंपनीने दिलेल्या अधिकाराचा गैरवापर करीत कंपनीलाच लावला कोट्यवधी रुपयांचा चुना

 0
कंपनीने दिलेल्या अधिकाराचा गैरवापर करीत कंपनीलाच लावला कोट्यवधी रुपयांचा चुना

चाकण ( पुणे ) : कंपनीने दिलेल्या अधिकाराचा गैरवापर करून तब्बल तीन कोटी रुपयांचा कंपनीलाच चुना लावल्याची घटना चाकण औद्योगिक वसाहतमधील एका नामांकित कारखान्यात घडली आहे.याप्रकरणी महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 प्रकाश बालाजी धोंडगे (वय.४५ वर्ष,रा.मोशी,ता. हवेली,जि.पुणे) यांनी पोलिसांत दिलेल्या फिर्यादीवरून १) विवेककुमार अजेद्रनाथ ठाकूर ( वय.५३ वर्षे,रा.बाणेर,पुणे) आणि २) श्रीशराज नारायण पांडे (वय.४२वर्षे,रा.घोडबंदर रस्ता, कासरवडवली,ठाणे) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,चाकण औद्योगिक वसाहतमधील एचडी हयुंडाई कंन्स्ट्रक्शन इक्वीपेमेंट इंडीया प्रायव्हेट लिमीटेड कंपनी ( खालुंब्रे,ता.खेड.जि.पुणे) या कंपनीत विवेककुमार ठाकूर आणि श्रीशराज पांडे हे दोघे नोकरीस होते.या दोघांना कंपनीच्या वतीने त्यांना फोर्कलिफट मशिन वितरकांना विकत देण्याचा अधिकार देण्यात आला होता.कंपनीने दिलेल्या अधिकारपदाचा गैरवापर करीत (दि. मार्च २०२१ तेजुन २०२४) या दरम्यानच्या कालावधीत वितरकास फोर्कलिफट मशिन कमी किंमतीत विक्री केली.त्यातून आलेल्या पैस्यांची अफरातफर करत विवेककुमार ठाकूर याने एकुण १ कोटी ३९ लाख रुपयेची तर श्रीशराज पांडे याने १ कोटी ४० लाख रुपयेची अशी एकूण रक्कम २ कोटी ७९ लाख रुपयांची फसवणूक केली आहे.दोघांनी संगनमत करीत अफरातफर करून आलेले कोट्यवधी रुपये विवेककुमार याने पत्नी व मुलीचे नावे असलेल्या फर्मचे बँक खात्यात तर श्रीशराज याचे पत्नीचे नावे असलेल्या फर्मचे बैंक खात्यात वळवून ती स्वतःच्या फायद्यासाठी वापरून कंपनीची फसवणूक केली आहे.महाळुंगे पोलीस ठाण्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक नितीन गीते यांच्या मार्गदर्शनाखाली येथील पोलीस पुढील तपास करीत आहेत.