बनावट चेक आणि कागदपत्रे तयार करून कंपनीची तब्बल साडे सात कोटी रुपयांची फसवणूक

 0
बनावट चेक आणि कागदपत्रे तयार करून कंपनीची तब्बल साडे सात कोटी रुपयांची फसवणूक

चाकण (पुणे) : रिझर्व्ह बँकेच्या नावाचा बनावट चेकवर स्वाक्षरी आणि शिक्के तसेच इतर कागदपत्रे तयार करुन ते कंपनीच्या मेल आयडीवर पाठवून बनावट दस्त खरा असल्याचे भासवून वेळोवेळी कंपनीचे ईमेल पाठवून तब्बल सात कोटी पन्नास लाख रुपयांचा अपहार केल्याची घटना चाकण औद्योगिक क्षेत्रातील एका कंपनीत उघडकीस आली आहे.

  पंचेचाळीस वर्षीय इसमाने म्हाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून १) ललीत शांतीलाल गांधी (वय.५० वर्षे,धंदा व्यवसाय, रा एफ ३०१, रोहन कृतीका, पु.ल. देशपांडे उद्यानजवळ,सिंहगड रोड, पुणे.),२) सुधिर उद्धव सोनवणे तसेच एक महिला (रा.सहजीवन सोसायटी,एम.एच.बी.कॉलणी,खैरनगर,वांद्रे ईस्ट,मुंबई.) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,चाकण औद्योगिक वसाहतमधील महाळुंगे गावच्या हद्दीतील कोझेमे प्रिसीझन पार्ट इंडीया प्रा.लि.या कंपनीत (२०१३ ते २०१७ )दरम्यानच्या कालावधीत फिर्यादीचे कंपनीने ललित गांधी यांच्या सांगण्यावरून टिम लॉजीस्टीक्स इंडीया प्रा.लि.कंपनीचे दोन बँक खात्यावरून स्वतःच्या खात्यात चेक आणि आरटीजीएस व्दारे Extra Duty Deposit Advance License and Deposite against Order in Orignal against non submission of EODC म्हणुन कोजेमे प्रिसीसन पार्ट इंडीया प्रा लि कंपनीने सात कोटी एक्काहत्तर लाख चारशे एकोणीस रुपये जमा केले.या रक्कमेपैकी बावीस लाख चौदा हजर आठशे ८९८ रुपये हे payment for appeal to obtain stay order साठी भरणा केली,आणि उर्वरीत शिल्लक ७ कोटी ४९ लाख ५३ हजार ५२१ रुपये रक्कम परत करणे अपेक्षित असताना ललित गांधी याने टिम लॉजीटीक्स इंडिया प्रा.लि.कंपनीचे संचालक सुधीर सोनवणे तसेच त्यांची पत्नी यांनी पुर्व नियोजित कट रचुन फिर्यादीचे कंपनीने ज्या कारणासाठी रक्कम विश्वासाने त्याचे खात्यावर जमा केली,त्या रकमेचा अपहार केला आहे.म्हाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन गीते यांच्या मार्गदर्शनाखाली येथील पोलीस पुढील तपास करत आहेत.