विद्यानिकेतन स्कूलमध्ये विद्यार्थांना कायदा - सुव्यवस्था मार्गदर्शन

चाकण ( पुणे ) : येथील श्री.एस.पी देशमुख शिक्षण संस्थेच्या विद्यानिकेतन स्कूल या प्रशालेत कायदा व सुव्यवस्था हा कार्यक्रम राबविण्यात आला.
याप्रसंगी पीएसआय चंद्रशेखर मोरखंडे, पीएसआय शुभम कोरडे,पोलिस काॅन्स्टेबल वैशाली खंडागळे, अर्चना हाडवळे,प्रियांका गिरी,शितल दौंडकर, शाळेचे मुख्याध्यापक दिपक शिंदे आणि स्वाती रणदिवे आणि समन्वयक माधुरी घोडेकर तसेच इयत्ता ७ वी ते ९ वी तील विद्यार्थी व शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
विद्यार्थ्यांना मोबाईल शाप की वरदान त्याचबरोबर मोबाईलाचा अभ्यास क्रमात होणारा उपयोग तसेच गुड ॲड बॅड टच,कलमे,कायदा व्यवस्था,बाल कामगार कायदा,टू व्हीलर वाहन कायदा तसेच शिक्षण पद्धतीमध्ये विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास (शारीरिक,मानसिक,सामाजिकआणि बौद्धिक) होणे महत्त्वाचे आहे.अभ्यासासह खेळांना ही महत्त्व द्यावे.१० वी व १२ वी नंतर तुम्ही या क्षेत्रात कसे पुढे जायचे याचे मार्गदर्शन करण्यात आले.
विद्यानिकेतन प्रशालेचे प्राचार्य दीपक शिंदे यांनी विद्यालयातील विद्यार्थ्यांना पोलीस खात्यामध्ये असणाऱ्या विविध करियर मधील संधी संदर्भात माहिती दिली.भविष्यात विद्यालयातील विद्यार्थी पोलिस खात्यामध्ये यापुढे सेवा देतील त्या विद्यार्थ्यांच्या हस्ते शाळेच्या ध्वजारोहणाचा बहुमान दिला जाईल. तसेच स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी चांगला प्रयत्न करून विविध शासकीय सेवेमध्ये रुजू होऊन शाळेचा लौकिक वाढवावा.असे आवाहन केले.सीता नायवाडी यांनी सर्वांचे आभार मानले.