जेष्ट महिलेच्या गळ्यातील सोन्याचे दागिने लांबवणाऱ्या भामट्यास अटक

 0
जेष्ट महिलेच्या गळ्यातील सोन्याचे दागिने लांबवणाऱ्या भामट्यास अटक

चाकण (पुणे) : किराणा मालाच्या दुकानातील जेष्ट महिलेच्या गळ्यातील साठ हजार रुपये किमितीचे सोन्याचे दागिने हिसकावून लांबवल्याची घटना (दि.३)सकाळी साडे आठ वाजण्याच्या सुमारास चाकणच्या विशाल गार्डन येथे उघडकीस आहे.

 चाकण पोलीस ठाण्यात पासष्ट वर्षीय जेष्ठ महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून यशवंत दिगंबर सुर्यवंशी (वय.३२ वर्षे,रा.मेदनकरवाडी,ता.खेड) या भामट्यास ताब्यात घेतले आहे.

 याबाबतची अधिक माहिती अशी की,फिर्यादी जेष्ठ महिला या चाकण - शिक्रापूर रस्त्यावरील विशाल गार्डन येथील श्री समर्थ किराणा दुकानामध्ये असताना यशवंत सूर्यवंशी याने जेष्ठ महिलेचे बेसावधपणाचा फायदा घेत,जबरदस्तीने गळयातील ५७,०००. रूपये किमतीचे एकुण ९.७५० ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने हिसकावून घेवून पळून गेला होता.समांतर तपासकामी गुन्हे शाखा युनिट तीनचे पोलीस निरीक्षक जितेंद्र कदम यांच्या पथकाने घटनास्थळाचे परिसरासह वीस किलोमीटर अंतरापर्यंत सीसीटीव्ही तपासले असता,यशवंत सूर्यवंशी हा (नंबर एमएच १४,एचई २४९३) दुचाकीवर औद्योगिक क्षेत्रातील संधार कंपनीजवळून शिताफिने ताब्यात घेवून त्यांचेकडे सखोल चौकशी केली असता सदर गुन्ह्याची कबुली दिली आहे.चाकण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक प्रसन्न जराड करत आहेत.