आदिवासी कुटुंबाचे घर आगीत जळून खाक झाल्याने गावकऱ्यांकडून मदत

 0
आदिवासी कुटुंबाचे घर आगीत जळून खाक झाल्याने गावकऱ्यांकडून मदत

चाकण ( पुणे ) : कोरेगाव खुर्द (ता.खेड ) येथील एका गरीब आदिवासी कुटुंबाचे घर जळून खाक झाले आहे.आगीमध्ये संसारपयोगी वस्तू जळून गेल्याने कुटुंबासमोर जगायचे कसे,असा यक्षप्रश्न त्याच्यापुढे उभा राहिला होता.परंतु गावकऱ्यांनी मदत केल्याने कुटुंबाने समाधान व्यक्त केले आहे.

    कविता रामदास मेंगळे यांचे राहत्या घराला अचानक आग लागल्याने घरातील धान्य,कपडे, भांडी,कागदपत्रे,मुलांच्या वह्या,पुस्तके, दप्तर आदी संसारपयोगी सर्व वस्तू आगीत भस्मसात झाल्या आहेत.सरपंच सीमाताई राजुशेठ झांबरे यांनी कुटुंबातील दोन महिने पुरेल एवढा किराणामाल देण्यात आला.चेअरमन सुनील घनवट यांनी धान्य दिले तर ग्रामपंचायत सदस्य प्रकाश दोंद,उपसरपंच होणा मेंगळे,रोहिदास कडूसकर,शरद गुलाब बुटे यांनी आर्थिक स्वरूपात मदत केली.

आगीत भस्मसात झालेल्या घराचा तलाठी आणि ग्रामसेवकाने पंचनामा केला आहे.संबंधित कुटुंबाला शासनाकडून त्यांना मदत मिळावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे.