माऊली सेवा प्रतिष्ठानकडुन राजगुरूनगर येथील गरीब गरजूंना मोफत कपडे वाटप

 0
माऊली सेवा प्रतिष्ठानकडुन राजगुरूनगर येथील गरीब गरजूंना मोफत कपडे वाटप

राजगुरूनगर (पुणे) : येथील माऊली सेवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून राजगुरूनगर येथील कातकरी वस्ती,वाघेवस्ती,आण्णाभाऊ साठे नगर आणि राजगुरूनगर शहरातील जवळपास १२० गरजु कुटूंबांना ४५ पोती कपड्यांचे मोफत वाटप करण्यात आले. 

राजगुरूनगर येथील नागरिकांकडुन लहानांपासून ते वयोवृध्दापर्यंतचे जुने परंतु वापरण्यायोग्य असलेले कपडे माऊली सेवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून गोळा करण्यात येतात.जमा झालेल्या कपड्यांचे योग्य असे वर्गीकरण करुन,असे कपडे तालुक्यात ज्या गावात गरज असेल त्या ठिकाणी माऊली सेवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून वितरीत केले जातात.

गेल्या एक महिन्यात प्रतिष्ठानकडे मोठ्या प्रमाणात कपडे जमा झाले होते.या कपड्यांची विभागणी करून चांगल्या स्थितीतील कपड्यांचे वाटप गरजु नागरिकांना करण्यात आले.कपडे मिळाल्यानंतरचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर ओसंडुन वाहत होता.

यावेळी माऊली सेवा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष कैलास दुधाळे,मुख्याध्यापक संजय घुमटकर, वासुदेव गोपाळे,अविनाश पाटील,दत्ताभाऊ रुके बाबाजी कातोरे,सविता लोंढे,दिलीप राक्षे यांनी कपडे वाटपाचे नियोजन केले.