राजगुरूनगर येथे मैत्रीण ग्रुपकडून पुरस्कार प्रदान सोहळा आणि कवी संमेलन
राजगुरुनगर ( पुणे ) : महाराष्ट्र दिन व कामगार दिनाच्या निमित्ताने राजगुरुनगर शहरात विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या महिला व पुरुषांना मैत्रीण ग्रुपकडून पुरस्कार प्रदान तसेच कवी संमेलन आयोजित करण्यात आले होते.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष जि.रं.शिंदे होते,प्रमुख पाहुणे शांताराम बापू घुमटकर,महाराष्ट्र साहित्य परिषद राजगुरुनगरचे अध्यक्ष कवी सतोष गावढे हे उपस्थित होते.
राजगुरूनगर शहराचे माजी सरपंच शांताराम बापू घुमटकर यांना राजगुरुनगर रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.तसेच स्वाभिमानी रिपब्लिकन महासभा यांचे संस्थापक अध्यक्ष हरेशभाई देखणे यांना समाज गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.सपना राठोड ( निसर्ग प्रेमी ) यांना वसुंधरा पुरस्कार देण्यात आला.डॉ.निलम गायकवाड,डॉ.स्नेहा पारधी, डॉ.शितल खिसमतराव,डॉ.कुंतल जाधव,डॉ.कल्याणी पवार यांना रणरागिणी पुरस्कार प्रदान करण्यात आला.यावेळी पार पडलेल्या कवी संमेलनात एकवीस कवीनी भाग घेतला होता.
या कार्यक्रमासाठी हुतात्मा राजगुरू सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष बाळासाहेब सांडभोर,रोटरी क्लब ऑफ राजगुरूनगरचे अध्यक्ष राजन जांभळे,शिवसेना महिला आघाडी जिल्हा प्रमुख विजयाताई शिंदे आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे आयोजन मैत्रीण ग्रुप राजगुरूनगरच्या सर्व सदस्यांनी केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रसिद्ध निवेदक राजेश लाडके यांनी केले तर आभार कवियत्री रामेश्वरी कडलग यांनी केले.