संत ज्ञानेश्वर महाराज सप्तशतकोत्तर सुवर्ण महोत्सव; आळंदीत अखंड हरिनाम सप्ताह
आळंदी ( पुणे ) : श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या सप्तशतकोत्तर (७५० वा.) सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त अलंकापुरीत उत्साही मंगलमय,धार्मिक, भक्तिमय वातावरणात वारकरी संप्रदायास साजेसा अखंड हरिनाम सप्ताह अंतर्गत ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचा प्रारंभ डॉ.नारायण महाराज जाधव यांचे हस्ते हरिनाम गजरात झाला.
आळंदीतील या सोहळ्यास भल्या पहाटे उद्घाटनास महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील,डॉ.नारायण महाराज जाधव,श्री विठ्ठल रुक्मिणी संस्थानचे सहअध्यक्ष गहिनीनाथ औसेकर महाराज,आमदार बापूसाहेब पठारे, मुक्ताईनगर देवस्थानचे प्रमुख रवींद्र भैय्या पाटील, पुरुषोत्तम महाराज मोरे,माणिक महाराज मोरे, आळंदी देवस्थानचे प्रमुख विश्वस्त योगी निरंजन नाथसाहेब,विश्वस्त राजेंद्र उमाप,डॉ.भवार्थ देखणे, चैतन्य महाराज लोंढे कबीरबुवा,विश्वस्त रोहिणी पवार,विश्वस्त पुरुषोत्तम दादा पाटील,माजी नगरसेवक डी.डी.भोसले पाटील,माजी नगराध्यक्ष राहुल चिताळकर,वैजयंती उमरगेकर,बबनराव कुऱ्हाडे,नंदकुमार कुऱ्हाडे,संजय घुंडरे आदींसह ग्रामस्थ आणि वारकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
श्री ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्यास एवढ्या पहाटे पासून मोठ्या संख्येने भाविक उपस्थित आहेत. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या साडेसातशेव्या जन्मोत्सवी वर्षा निमित्त तसेच संत नामदेवांच्या ६७५ व्या समाधी वर्षे,संत तुकाराम महाराजांच्या ३७५ व्या सदेह वैकुंठ गमना वर्ष पूर्ती निमित्ताने तीनही योग आलेत.या सोहळ्याचे आयोजनात संस्थान आणि गावकरी यांचा सोहळ्यात समन्वय दिसत आहे.त्याबद्दल खूप आनंद व्यक्त करतो. ज्ञानेश्वरीवर बोलण्याची माझी पात्रता नाही. मात्र ज्ञानेश्वरीचे जवळ आहे. मी आज जो आहे तो चौथ्या वर्षी कळत नव्हतं अशा वेळेला निरक्षर सही पण करता न येणाऱ्या वडिलांनी ज्ञानेश्वरी वाचनाचा आग्रह झाला.काहीच कळत नव्हतं.तेव्हापासून सातत्याने ज्ञानेश्वरी वाचनाचा माझ्यावर परिणाम आहे.असे म्हणत उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी सोहळयास सद्दिच्छा दिल्या.