चाकण औद्योगिक क्षेत्रातील कंपनीची लाखो रुपयांची फसवणूक

 0
चाकण औद्योगिक क्षेत्रातील कंपनीची लाखो रुपयांची फसवणूक

चाकण ( पुणे ) : मागणीप्रमाणे कच्चा मालाचा पुरवठा न करता कमी दर्जाच्या मालाचा पुरवठा करून साडे तीन लाख रुपयांची चाकण औद्योगिक वसाहतमधील एका कंपनीची फसवणूक केल्याची तक्रार महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात दिली आहे.

 चवत्तीस वर्षीय फिर्यादी ( धंदा नोकरी,रा. प्राधिकरण,ता.हवेली जि.पुणे) यांनी म्हाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार सुरेश चौधरी (रा.मुंबई) याच्या गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,चाकण औद्योगिक क्षेत्रातील डब्ल्युटीई इंन्फ्रा प्रोजेक्ट प्रा.लि (सावरदरी,ता.खेड) या कंपनीने सागर मेटल इंडस्ट्रिज (हिराकुंज,गिरगाव,मुंबई) चे मालक सुरेश चौधरी याला कच्च्या मालाची पर्चेस ऑर्डर देण्यात आली होती.मागणीनुसार कच्चा मालाचा पुरवठा न करता फिर्यादी कंपनीकडून कडून सदर मालाचे ७,१५,३७५ रुपये घेतले.परंतु मागणीप्रमाणे कमी दर्जाचा ( ग्रेड 55202) ३,६८,५५० रुपयांचा कच्चा माल देऊन ३,४६,८२५ रुपयांची फसवणूक केली आहे.सदर घटना (दि.१५/०१/२०२४ ते दि.०२/१२/२०२४) दरम्यानच्या कालावधीत घडली आहे.

०००००