खेड तालुका आणि मावळ तालुक्याला जोडणाऱ्या सांगुर्डी ते इंदोरी शिव रस्त्याचे भूमिपूजन
चाकण (पुणे) : खेड तालुक्याच्या सीमेवरील सांगुर्डी ते इंदोरी ( ता.मावळ ) शिव रस्त्याची अत्यंत बिकट अवस्था झाली होती.सात कोटी रुपयांच्या १५ व्या वित्त आयोग आणि पीएमआरडीएच्या निधीच्या माध्यमातून नूतनीकरण कामाचे भूमिपूजन मावळ तालुक्याचे आमदार सुनील शेळके यांच्या हस्ते करण्यात आले.
याप्रसंगी सरपंच तथा पीएमआरडीएचे सदस्य वसंत भसे,माजी सभापती विठ्ठल शिंदे,खरेदी विक्री संघाचे संचालक दिलीप ढोरे,सरपंच शशिकांत शिंदे,उमेश बोडके,प्रकाश हगवणे,संदीप ढोरे,मारुती नारायण भसे,दिनकर भसे,संगीता शरद भसे,संदीप चव्हाण,सुदाम भसे,भीमराव काळे,ऋषिकेश भसे आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मागील ३० - ४० वर्षांपासून खेड तालुका आणि मावळ तालुक्याला जोडणाऱ्या सांगुर्डी ते इंदोरी शिव रस्त्याची नूतनीकरणा अभावी अत्यंत बिकट अवस्था झाली होती.रस्त्यावर मोठ मोठे खड्डे पडले होते. रस्त्यावरील खडी उखडल्याने वाहने चालवताना मोठी कसरत करावी लागत होती.परंतु ग्रामपंचायतच्या १५ व्या वित्त आयोग आणि पीएमआरडीएच्या निधीतून या मार्गाचे नूतनीकरणाचे काम मार्गी लागत आहे.तसेच गावातील कचरा व्यवस्थापन करण्यासाठी घंटागाडीचे लोकार्पण करण्यात आले.