वाकळवाडीच्या सरपंचपदी नरेंद्र वाळुंज यांची बिनविरोध निवड

 0
वाकळवाडीच्या सरपंचपदी नरेंद्र वाळुंज यांची बिनविरोध निवड

राजगुरूनगर ( पुणे ) : श्रीक्षेत्र वाकळवाडी (ता.खेड ) ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी नरेंद्र संभाजी वाळुंज यांची बिनविरोध करण्यात आली आहे.मावळत्या सरपंच मंगल महादू कोरडे यांना महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५८ चे कलम ३९(३) नुसार ग्रामविकास मंत्री यांच्या आदेशाने अपात्र ठरविण्यात आले.त्यानंतर घेण्यात आलेल्या विशेष सभेत नरेंद्र वाळुंज यांची बिनविरोध निवड करण्यात आली. 

 वाकळवाडी ग्रामपंचायत सभागृहात निवडणूक अधिकारी तथा मंडलाधिकारी माणिक गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली निवडणूक घेण्यात आली. सरपंचपदासाठी नरेंद्र वाळूंज यांचाच एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड झाल्याची घोषणा करण्यात आली.ग्राम पंचायत अधिकारी अजित पलांडे आणि तलाठी ब्रम्हानंद टाचले यांनी निवडणूक कामकाजात मदत केली.

यावेळी सभागृहात सोपान बबन भालेकर,रुपाली खुशाल पवळे,शैला शशिकांत बांगर,शिवराज्ञी धर्मराज पवळे,जयसिंग किसन पवळे या सदस्यांसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आमदार बाबाजी काळे आणि माजी आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या हस्ते वाळूंज यांचा सत्कार करण्यात आला.

निवडीनंतर गुलालाची उधळण करत गावातून वाजतगाजत मिरवणूक काढण्यात आली.ग्रामस्थांच्या वतीने जाहीर नागरी सत्कार करण्यात आला.गावाचा सर्वांगीण विकास, महिला व युवकांना सक्षम करणे आणि प्रशासनात पारदर्शकता आणणे, यांस माझे प्राधान्य राहील,असे नूतन सरपंच नरेंद्र वाळुंज यांनी सांगितले