भामा आसखेड धरणग्रस्त शेतकऱ्यांचे प्रश्न लागणार मार्गी; आमदारांसह प्रकल्पग्रस्तांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट
मुंबई : गेली वीस वर्षापासून भामा आसखेड धरणग्रस्त हे पुनर्वसनापासून वंचित आहेत.प्रकल्प बाधित शेतकऱ्यांना पर्याय जमीन मिळावी तसेच आंदोलनातील कालावधीत शेतकऱ्यांवर शासनाने केलेले गुन्हे आणि प्रलंबित प्रश्न सोडवण्याची मागणी प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांकडून करण्यात आली आहे.
खेड आळंदीचे आमदार बाबाजी काळे यांना प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी निवेदन देण्यात आल्यावर काळे यांना या संदर्भात त्वरित संबंधित मदत व पुनर्वसन मंत्री आणि गृहमंत्री यांच्याशी चर्चा करण्यासाठी धरणग्रस्त प्रतिनिधी सत्यवान नवले व शंकर साबळे यांना सोबत घेऊन मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचे विधानभवन दालनामध्ये भेट घेतली व शेतकऱ्यांवरील गुन्हे मागे घेण्यासंदर्भात चर्चा करून निवेदन दिले.सदर निवेदनावरती मुख्यमंत्र्यांनी तात्काळ कार्यवाही करण्यात यावी अशा आदेश संबंधित प्रशासनाला दिला.तसेच पुनर्वसनाच्या प्रलंबित मागण्यासाठी मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनाही त्याबाबतचे निवेदन देण्यात आले.लवकरच भामा आसखेड धरणग्रस्त शेतकऱ्यांचे प्रश्न प्राधान्याने सोडवू असे आश्वासन आमदार बाबाजी काळे यांनी शेतकऱ्यांना दिले.