चाकणच्या झित्राईमळा शाळेत सलग तिसऱ्या वर्षी रंगले बालकवी संमेलन

 0
चाकणच्या झित्राईमळा शाळेत सलग तिसऱ्या वर्षी रंगले बालकवी संमेलन

चाकण ( पुणे ) : खेड तालुक्यातील चाकण पालिका हद्दीतील झित्राईमळा येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत मराठी राजभाषा दिनाच्या पार्श्वभूमीवर तालुकास्तरीय बालकवी संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते.

  संमेलनात खेड तालुक्यातील शिवे,गुंडाळवाडी, धानोरे,वडगाव घेनंद,कुरुळी,रासे,एकतानगर, खराबवाडी,वाकी खुर्द,बुट्टेवाडी,टाकळकरवाडी, होलेवाडी,चाकण क्र.2,मेदनकरवाडी,दावडमळा,कुरुळी,किवळे,खालूंब्रे,रासे,थिगळस्थळ, वाघाजाईनगर,खराबवाडी, आणि झित्राईमळा अश्या शाळांमधील एकूण 105 विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून निसर्ग,आई -वडील, मैत्री,शाळा,शिक्षक,छत्रपती शिवाजी महाराज, ताराराणी,आजी -आजोबा,पुस्तक,पाण्याची बचत, प्रदूषण,सैनिक,नदी अशा विविध विषयावरील कवितांचे सादरीकरण केले. 

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बालसाहित्यिक, अभिनेत्री,निवेदक,चित्रकार आणि इयत्ता चौथीच्या बालभारतीच्या पुस्तकात समाविष्ट असलेल्या 'मिठाचा शोध' पाठाच्या लेखिका अंजली अत्रे या होत्या. 

चाकण बीटचे विस्ताराधिकारी राजेंद्र टिळेकर, महाळुंगे(इं) केंद्राच्या तत्कालीन केंद्रप्रमुख आणि आमोंडी बीटच्या माजी विस्ताराधिकारी सुगंधा भगत,विशेष शिक्षण विभागाच्या समन्वयक प्रतिभा भांगे,विषयतज्ञ सुचित्रा घुगे,झित्राईमळा शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा निलम गव्हाणे, सदस्या गायत्री नार्वेकर,प्रियांका मुळे,शिक्षक ज्ञानेश्वर मोकाशी,धनंजय केंगले,बाबाजी शिंदे, नारायण करपे,सत्यवान लोखंडे,शैला जांभळकर, शितल थोरवे,सुवर्णा मिसाळ,प्रशांत कुंजीर, उज्ज्वला क्षीरसागर,संगिता क्षीरसागर,मनिषा शिंदे, सुनिता वाव्हाळ,अभिमन्यू कौले,सुरेखा साबळे, महेंद्र गाडे,प्रतिभा टकले,गणेश मिसाळ,सचिन शिंदे,गणेश गोरे,सतिश यानभुरे,नुतन कडलग आदींसह बहुसंख्य बालकवी आणि त्यांचे पालक उपस्थित होते. 

तृष्णा घुमटकर,डॉ.शेखर घुमटकर,शुभांगी पवार, पुनम पानसरे,सोनाली वाबळे,भाऊराव पांडे, सुरेखा ठोके,नंदेश्वरी गव्हाणे,झित्राईमळा शाळेच्या मुख्याध्यापिका मीना शिंदे,जावेद पठाण,वैशाली घुमटकर,संजाबाई डवणे,सविता भालचीम,अश्विनी भोईटे यांचे विशेष सहकार्य लाभले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक लेखक मनोहर मोहरे यांनी केले तर धानोरे शाळेच्या आदर्श शिक्षिका अनिता परदेशी यांनी सूत्रसंचालन केले आणि झित्राईमळा शाळेच्या उपक्रमशील शिक्षिका,कवयित्री स्नेहल भोर यांनी सर्वांचे आभार मानले.