विकासकामांसाठी नेहमीच कटिबद्ध : शेखरभाऊ घोगरे

चाकण ( पुणे ) : पठारवाडी (ता. खेड ) येथील जिल्हा परिषद शाळेच्या आवारात माजी नगराध्यक्ष शेखरभाऊ घोगरे यांच्या प्रयत्नातून ब्लॉक बसवण्यात आले होते.त्याचे उद्घाटन प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने करण्यात आले,यावेळी ते बोलत होते.ते म्हणाले,विकासकामांच्या बाबतीत आम्ही कधीच हात आखडता घेतला नाही.जिथे गरज आहे तिथे प्राधान्याने काम केले आहे. पठारवाडी शाळा विकासापासून वंचित होती म्हणूनच प्राधान्याने हे काम हाती घेतले.येथील तरुणांच्या पाठपुराव्यामुळे कामाला गती मिळाली. भविष्यातही शाळेच्या भौतिक सुविधांबाबत सर्वतोपरी सहकार्य व मदत केली जाईल,असे अश्वासन दिले.
पठारवाडी शाळेत गोर गरीब शेतकरी,कातकरी तसेच मजूर कामगारांची साठ मुले शिक्षण घेत आहेत.त्यांना चांगल्या प्रकारचे मैदान उपलब्ध व्हावे आणि काट्याकुट्यांपासून संरक्षण मिळावे म्हणून गावातील तरुण कार्यकर्ते किशोर पठारे, आकाश पठारे,अक्षय पठारे,रोहन पठारे,नितीन पठारे,सौरभ पठारे,अक्षय लष्करे,आर्यन दौंडकर यांनी पुढाकार घेऊन निवेदक संकेत मचाले यांच्यामार्फत शेखरभाऊंशी संपर्क साधला होता. शेखरभाऊंनी परिस्थितिचा आढावा घेऊन तात्काळ कामास मंजूरी दिली आणि कमी वेळात दर्जेदार काम पूर्ण झाले.तसेच युवा उद्योजक विश्वास कौटकर यांनी संपूर्ण वॉल कंपाऊंडला मोफत रंगरंगोटी केल्याने शाळेचा चेहरा मोहरा बदलला असून या तरुणांचे सर्वत्र कौतुक होत आहे.याच तरुणांच्या पुढाकाराने काही दिवसांपूर्वी अतुलभाऊ देशमुख युवा फाऊंडेशनकडून शाळेला डायस सप्रेम भेट देण्यात आला होता.चाकणचे युवा उद्योजक वैभव सुभाष शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली काम उत्तम व दर्जेदार झाले आहे.
यावेळी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सोनालीताई शिंदे,उपाध्यक्ष सुवर्णा पठारे, प्रगतशील शेतकरी पांडुरंग पठारे,मच्छिंद्र पठारे , योगेश पठारे,सुलाभ पठारे,दत्ताभाऊ पठारे,रामचंद्र पठारे,दिनेश सोनवणे,सुजित पठारे,शिक्षिका माधुरी लोधी,ललिता पठारे,गितांजली भोईर,किर्ती पठारे,नंदा लष्करे,शिवाजी मुकणे तसेच विद्यार्थी, पालक,ग्रामस्त,महिला बहुसंख्येने उपस्थित होते. यावेळी मुलांचे सांस्कृतिक कार्यक्रम पाहून ग्रामस्थांनी कौतुक केले,मच्छिंद्र पठारे यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले,पांडुरंग पठारे अध्यक्षस्थानी होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचलन मुख्याध्यापक मनोहर मोहरे यांनी केले तर आभार माधुरी लोधी यांनी मानले .