१७ व्या राष्ट्रीय स्पर्धेत चाकणचे ९७ विद्यार्थी सहभागी
चाकण ( पुणे ) : चाकण येथे संतोष ऑल राऊंडर अकॅडमी आणि सारा अबॅकस अकॅडमी यांच्या अंतर्गत इंटरनॅशनल अबॅकस मॅथेमॅटिक्स असोसिएशन,भारत यांच्या संयुक्त विद्यमाने १७ व्या राष्ट्रीय स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.यात सुंदर हस्ताक्षर,वैदिक गणित,चित्रकला,रोबोटिक्स, फोनिक्स,अबॅकस,रुबिक क्यूब या विविध विषयांच्या राष्ट्रीय स्पर्धेचे आयोजन प्रत्येक वर्षी केले जाते.३ मिनिटांनी ५ मिनिटांमध्ये अबॅकसच्या आधारे क्लिष्ट,कठीण १०० उदाहरणं सोडवण्याची स्पर्धा घेतली जाते.या विविध प्रकारच्या स्पर्धेचे आयोजन नियोजन आणि सराव अकॅडमी येथे घेतला जात होता.चाकण आणि चाकण पंचक्रोशीतील सर्व गावातील सर्व शाळेचे विद्यार्थी या स्पर्धेमध्ये सहभागी होतात.
यावर्षी चाकण येथे ९७ विद्यार्थी राष्ट्रीय स्पर्धेमध्ये सहभागी झाले आहेत.राष्ट्रीय स्पर्धेचा फायनल आणि शेवटचा राऊंड ९ फेब्रुवारी २०२५ रोजी पुणे येथे संपन्न होणार आहे.ही स्पर्धा संपूर्ण भारतामध्ये प्रत्येक राज्यातून विभागानुसार घेतली जाते.पुणे विभागातील सात जिल्ह्यातील २०५ विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभाग नोंदवलेला आहे.दुसऱ्या व फायनल राऊंडसाठी चाकण येथील ४० विद्यार्थ्यांची निवड झाली आहे.चाकण येथील अकॅडमीचे घवघवीच्याबद्दल शिक्षकांनी पालकांनी कौतुक केले.या विद्यार्थ्यांचा सराव स्वाती ढबाले, संध्या जाधव,सुजाता वायकर आणि प्राचार्या डॉ. अर्चना प्रवीण आघाव यांनी घेतला आहे,अशी माहिती अकॅडमीचे डायरेक्टर डॉ.प्रवीण आघाव यांनी दिली आहे.