राजगुरूनगर येथे रंगले 'पाऊसधारा' कवीसंमेलन; पुरस्कार वितरण सोहळा संपन्न

 0
राजगुरूनगर येथे रंगले 'पाऊसधारा' कवीसंमेलन;  पुरस्कार वितरण सोहळा संपन्न
राजगुरूनगर येथे रंगले 'पाऊसधारा' कवीसंमेलन;  पुरस्कार वितरण सोहळा संपन्न

राजगुरूनगर (पुणे) : येथील ज्येष्ठ नागरिक संघाच्या सभागृहात मैत्रीण ग्रुप राजगुरूनगर आयोजित 'पाऊसधारा' कवीसंमेलन व पुरस्कार वितरण सोहळा आणि निसर्ग प्रतिष्ठान अवसरी खुर्द पुरस्कार वितरण सोहळा एकूण ४५ कवींच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात पार पडला. 

अध्यक्षस्थानी राजगुरूनगर सहकारी बँकेचे विद्यमान संचालक सचिन मांजरे होते.प्रमुख पाहुणे म्हणून 'कवयित्री शांता शेळके प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष, महाराष्ट्र साहित्य परिषद,शाखा मंचरचे अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक डॉ.दत्ताजी पायमोडे,पुणे जिल्हा समता परिषदेचे सन्माननीय अध्यक्ष तथा राजगुरूनगर नगरीचे माजी सरपंच माननीय शांतारामबाप्पू घुमटकर हे उपस्थित होते.

'मैत्रीण ग्रुप,राजगुरूनगर' च्या संस्थापिका अध्यक्षा आणि सोहळ्याच्या आयोजिका सपनाताई राठोड यांनी दिलेल्या माहितीनुसार 'बापा तुझे आभाळ' या दीर्घ काव्याचे प्रसिद्ध कवी, लेखक, व्याख्याते प्रा. डॉ. हनुमंत भवारी यांना 'राजगुरूनगर रत्न पुरस्कार, आज-२४ तासचे संपादक सन्माननीय नितीन कांबळे यांना 'समाजभूषण' पुरस्कार, 'हरिश्चंद्र' कादंबरीच्या लेखिका,कवयित्री मीनाक्षी डफळ पाटोळे यांना 'रणरागिणी' पुरस्कार तर आदर्श शिक्षिका,निवेदिका,कवयित्री,सैनिक निधीसाठी मोलाचे काम करणाऱ्या 'तिचा मुक्त कॅनव्हास'कार स्नेहल संजीव भोर यांना 'रणरागिणी पुरस्कार' देऊन गौरविण्यात आले.

निसर्ग प्रतिष्ठान अवसरी खुर्दचे अध्यक्ष विशाल टेमकर यांनी दिलेल्या माहितीनुसार प्रतिष्ठानच्या वतीने आतापर्यंत हजारो झाडे लावणाऱ्या आणि त्याचे संगोपन करणाऱ्या मैत्रीण ग्रुपच्या संस्थापिका अध्यक्षा कु.सपना हिराचंद राठोड यांना 'राजगुरूनगर निसर्गकन्या पुरस्कार', मुळशी येथे स्वामी निवास वृद्धाश्रम चालवत सुमारे ८५ ज्येष्ठ नागरिकांचा विनाशुल्क सांभाळ करणाऱ्या श्रीमती गौरी धुमाळ यांना 'माय माऊली पुरस्कार' तर उजाड माळरानावर झाडे लावून त्यांचे संगोपन करणारे आदर्श व्यक्तिमत्व अनिल सहादू भोर यांना 'निसर्गसूत पुरस्कार' देऊन गौरविण्यात आले.

याप्रसंगी खेड तालुका ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष मधुकर खेडकर,निसर्ग प्रतिष्ठानचे सचिव वैभव टेमकर,मिलिंद टेमकर,वाचनमैत्री ग्रुपच्या संस्थापिका अध्यक्षा मयुरीताई भवारी,डॉ.निलम गायकवाड, प्रसिद्ध कवी-लेखक मनोहर मोहरे, सेवानिवृत्त आदर्श शिक्षक जि.र.शिंदे,सेवानिवृत्त आदर्श शिक्षिका मीनाताई नाझरे,ज्येष्ठ कवयित्री पुष्पलता जाधव आदी मान्यवर उपस्थित होते. 

 ४५ कवी आणि ७ पुरस्कारार्थी यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. 

कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन निवेदिका स्नेहल संजीव भोर यांनी केले तर आभार रामेश्वरी कडलग यांनी मानले.