इंटरनॅशनल मॅथेमॅटिक स्पर्धेत चाकणचे 57 विद्यार्थी राष्ट्रीय विजेते

चाकण ( पुणे ) : इंटरनॅशनल मॅथेमॅटिक असोसिएशन भारत आणि संतोष ऑल राऊंडर अकॅडमी व सारा अबॅकस अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने 17 वी राष्ट्रीय स्पर्धा नुकतीच संपन्न झाली. या राष्ट्रीय स्पर्धे संपूर्ण भारतभरातून 50 विभागांमध्ये विद्यार्थी सहभागी झाले होते. पुणे विभागातून 205 विद्यार्थ्यांपैकी चाकणचे 57 विद्यार्थी प्रथम,द्वितीय,तृतीय,उपविजेता, सहविजेता आणि रिजनल अचिव्हर म्हणून विजेते झालेले आहेत.
17 व्या राष्ट्रीय स्पर्धेचा 15वा कौतुक सोहळा मोठ्या दिमाखात संपन्न झाला या कौतुक सोहळ्याचे अध्यक्ष जैन शिक्षण प्रसारक मंडळ चिंचवडचे मुख्याध्यापक जयप्रकाश दहिफळे,पुणे जिल्हा कोर्टाचे वरिष्ठ वकील गोरक्ष आव्हाड, सिम्बॉयसिस इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी विधी विभागाचे प्रा.संतोष आघाव,शिवव्याख्याते सचिन नागपुरे,मार्गदर्शक कृष्णा लोणारी आदी उपस्थित होते.
संतोष ऑल राऊंडर अकॅडमी आणि सारा अबॅकस अकॅडमीला राष्ट्रीय पातळीवरील प्रथम पारितोषिक मिळाले.अकॅडमीला बेस्ट टीचर व बेस्ट सेंटरचे पुरस्कार मिळाले.राष्ट्रीय स्पर्धेतील विजेत्या सर्व विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांना सुवर्णपदक, सन्मानचिन्ह आणि सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. संस्थेच्या संस्थापक डॉ.प्रवीण आघाव यांनी प्रास्ताविकामध्ये शिक्षण संस्थेची प्रगती आणि पुढील वाटचालीची माहिती दिली.विद्यार्थी मनोगत, पालक मनोगत,शिक्षक मनोगत मोठ्या उत्साहात झाली.प्रत्येक पालकांनी स्वतःच्या मुलाचे कौतुक केले.अतिशय कठीण अशा स्पर्धेत मुलं विजेते झाल्याबद्दल आनंद सर्वांचे चेहऱ्यावर दिसत होता. आरोग्य संस्कार शिक्षण,ज्ञानम परम ध्येयम या गोष्टी समाजासाठी आवश्यक आहे,अशी प्रतिपादन अतिथींनी केली.समाजामध्ये शिक्षण हा मुख्य घटक आहे शिक्षणामुळे माणसांमध्ये परिवर्तन होतात.दर्जेदार शिक्षण संस्था देण्यामध्ये श्री.एस. पी.आघाव पाटील शिक्षण संस्थेचे नाव अग्रगण्य आहे.शिक्षण संस्थेच्या चाकण,भोसे आणि कुरुळी या ठिकाणी तीन शाखा यशस्वीपणे कार्यरत आहेत.अकॅडमीचा आणि संस्थेचा लेखाजोखा प्राचार्या अर्चना प्रवीण आघाव यांनी सांगितला. स्वाती ढबाले आणि संध्या जाधव यांच्यासह सर्व शिक्षकांनी कार्यक्रमाचे नियोजन केले होते.अर्चना प्रवीण आघाव यांनी आभार प्रदर्शन केले.संतोष एरंडे यांनी सूत्रसंचालन केले.अशी माहिती शिक्षण संस्थेचे डायरेक्टर डॉ. प्रवीण आघाव यांनी दिली.