एमडी विक्री प्रकरणी तिघांना अटक; चाकण पोलिसांची दमदार कारवाई

 0
एमडी विक्री प्रकरणी तिघांना अटक; चाकण पोलिसांची दमदार कारवाई

चाकण (पुणे) : एमडी या अमली पदार्थाची विक्री केल्या प्रकरणी चाकण पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. ही कारवाई बुधवारी (१४ मे) रात्री मेदनकरवाडी येथे करण्यात आली. फिरोज अहमद फैमुल्ला खान (३०, चिखली. मूळ रा. उत्तर प्रदेश), जमील अहमद वारीस अली चौधरी (३४, चिखली. मूळ रा. उत्तर प्रदेश) निखिल सरोदे (पिंपरी) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल सुनील भागवत यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

 मेदनकरवाडी येथे मेफेड्रोन (एमडी) ड्रग्स विक्रीसाठी दोघेजण आले असल्याची माहिती मिळाल्याने पोलिसांनी फिरोज खान आणि जमील चौधरी या दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून ७.९० ग्रॅम एमडी, एक दुचाकी आणि तीन मोबाईल फोन असा एक लाख ५९ हजारांचा ऐवज जप्त केला. त्या दोघांनी हे अमली पदार्थ निखिल सरोदे याच्याकडून आणले असल्याचे सांगितल्याने पोलिसांनी सरोदे याला देखील अटक केली.वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली येथील पोलीस पुढील तपास करीत आहेत.